Friday, 9 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०९ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण -म्हाडाच्या नोकरभरतीत बनावट उमेदवार बसवून परिक्षा देणाऱ्या ६० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, सोलापूर, जालना, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर इथल्या उमेदवारांचा समावेश आहे.

****

औरंगाबाद शहरात गोवर संसर्ग संशयित बालकांची संख्या १४२ झाली आहे. यापैकी १७ बालकांना गोवर संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं असून काल आणखी सहा गोवर संशयित बालकं आढळली आहेत. दरम्यानं, पालिकेनं शहरात दहा ठिकाणी लसीकरण शिबीर घेतलं असून आतापर्यंत २३१ बालकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

****

उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना केंद्र शासनाच्या वतीनं विशेष सेवा पदक जाहीर झालं आहे. गडचिरोली परिक्षेत्रअंतर्गत नक्षलग्रस्त भागात कठिण आणि खडतर भागात सेवा बजावल्या बद्दल त्यांना हे पदक जाहीर झालं आहे.

****

आकाशवाणीतील सेवानिवृत्त कार्यक्रम अधिकारी मनिषा यशवंत देशमुख यांचं काल पुण्यात कर्करोगानं निधन झालं. त्या ६६ वर्षांच्या होत्या. देशमुख यांनी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रात दूरध्वनी परिचालक म्हणून काम केलं होतं. त्यानंतर त्या रत्नागिरी केंद्रात कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत असतांना काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.

****

सांगली जिल्ह्यातील मिरज इथं जनावरांच्या लंपी प्रार्दूभावामुळं गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेला म्हैस बाजार सुरू करण्यात यावा अशी मागणी रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महादेव कोरे यांनी केली आहे. शासनाने म्हैस बाजार सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा व्यापारी आणि शेतकरी संघटनेनं दिला आहे.

****

कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीला आजपासून सुरुवात होआहे. उपांत्यपूर्व फेरीसाठीचा पहिला सामना ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यात आज रात्री साडेआठ वाजता खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना अर्जेंटिना आणि नेदरलँड यांच्यात मध्यरात्री साडेबारा वाजता होईल.

//*********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...