Wednesday, 24 May 2023

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र 24 मे 2023 सकाळी 11.00 वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या झारखंड दौऱ्यावर रवाना झाल्या आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते आज राजधानी रांची इथं झारखंड उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्गघाटन होणार आहे. उद्या खुंटी इथं आयोजित महिला संमेलनालाही त्या उपस्थित राहणार आहेत.

***

राज्यात येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रातल्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान मुख्यतः कोरडं राहील, मात्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

***

हज यात्रेसाठी महाराष्ट्रातील भाविकांना लागणारा अतिरिक्त  खर्च कमी करावा अशी मागणी  खासदार इम्तियाज जलील यांनी, केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती ईराणी, अल्पसंख्याक केंद्रीय सचिव, हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि राज्य अल्पसंख्याक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे जलील यांनी केली आहे. या पत्रात विमान कंपन्यांच्या कारभाराबाबत देखील अनेक प्रश्न पस्थित करण्यात आले आहेत.    

***

परभणी जिल्ह्यातल्या मानवत, पाथरी आणि सोनपेठ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी संयुक्तपणे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचं आयोजन केलं आहे. येत्या सोमवारी एकोणतीस तारखेला मानवतच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हे शिबिर होणार आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांना, विविध विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळणार असून, शैक्षणिक तसंच स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

***

इंडियन प्रीमिअर लीग-आयपीएल क्रिकेट स्पर्धेत प्ले- ऑफ गटात आज दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. चेन्नई इथं एम ए चिदंबरम क्रीडासंकुलात संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना खेळवला जाईल.

 

//*************//

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

***

No comments: