Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 February 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
छत्रपती शिवाजी महाराज हे एक दूरदर्शी नेते, निर्भय योद्धा, संस्कृतीचे
रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप असून त्यांचे जीवन प्रत्येक पिढ्यांना प्रेरणा देतं
असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर संदेश देतानाच शिवाजी महाराज यांच्यावर आधारीत एक विशेष चित्रफीतही सामाईक
केली आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरी केली जात
आहे. महाराष्ट्रातून जवळपास दहा हजार शिवप्रेमी दिल्लीतील उत्सवात सहभागी झाले
असून हत्ती, घोड्यांसह पारंपारिक वेशात मिरवणूक
काढण्यात आली आहे. महाराष्ट्र सदनातही शिवजयंती साजरी करण्यात येत आहे.
****
मुंबई इथं राजभवनात तसंच शिवाजी पार्क इथं राज्यपाल रमेश बैस
यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
केलं.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन
करण्याचा निर्णय राज्यसरकारनं घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं
आहे. शिवनेरी इथं शिवजन्मोत्सव कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देण्याच्या
अनुशंगानं उद्या विशेष अधिवेशन बोलवण्यात आल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
सांगितलं आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर
ठेवून काम करावं, असं केंद्रीय
अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक इथं छत्रपती शिवाजी
महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी आज पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्याप्रसंगी
ते बोलत होते. राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे,
माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर
नंदकुमार घोडेले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरम्यान, शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
होत असून मोठ्या संख्येनं शिवप्रेमींकडून वाहन फेरी काढण्यात येत आहेत. तसंच विविध राजकीय- सामाजिक
संघटनांच्या वतीनं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येत आहे.
****
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे छत्रपती
संभाजीनगर इथं महासंस्कृती आणि महानाट्य या महोत्सवाचं येत्या २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान आयोजन
करण्यात आलं आहे. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त या कार्यक्रमांचं
आयोजन होत आहे. त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त क्रांती चौक
येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास समोर ३५० विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकानं
लेझीम नृत्य सादर करुन महाराजांना मानवंदना दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या
मन की बात या कार्यक्रम मालिकेतून येत्या रविवारी २५ फेब्रुवारी
रोजी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम
मालिकेचा हा एकशे दहावा भाग असेल. नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार माय गोव आणि नमो
ॲपवर पाठवाव्यात, तसंच एक आठ शुन्य
शुन्य-एक एक- सात आठ शुन्य शुन्य या क्रमांकावर
पाठवान्याच्या आव्हान करण्यात आला आहे.
****
दिल्ली इथं शेतकरी
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात सकारात्मक
चर्चा झाली असून सरकारकडून सादर केलेल्या प्रस्तावाला शेतकरी प्रतिनिधींनी सहमती
दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नांदेड इथं छत्रपती शिवाजी महाराज याच्या जयंतीनिमित्त आज
सकाळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदींची उपस्थिती होती.
****
जळगाव इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष
प्रसाद यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
****
मराठवाड्यातल्या युवक-युवतींसाठी नोकरी, व्यवसाय
मार्गदर्शन शिबीर आणि विभागीय नमो महारोजगार मेळावा येत्या २३ ते
२४ फेब्रुवारीला लातूर इथं होणार आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी, एच
टी टी पी एस कोलन डबल स्लॅश एन एम आर एम लातूर डॉट इन, या
संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वारंगा फाटा इथं काल २२
बैलांना कोंबून नांदेडकडं जाणारा ट्रक नागरिकांनी आणि पोलिसांनी पाठलाग करून
पकडला. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या
महिला प्रो लीगमध्ये आज राउरकेला इथं भारतीय पुरुष संघाचा सामना स्पेनशी होणार
आहे. दरम्यान, काल झालेल्या महिलांच्या सामन्यात
भारतानं अमेरिकेचा पराभव केला. एक विरुद्ध एक गोलनं सामना अनिर्णित राहिल्यानंतर
भारतानं शूट-आऊट बोनसमध्ये दोन गुण जिंकले. सामन्याच्या
पूर्वार्धात दीपिकानं गोल करुन भारताचं खातं उघडलं. अमेरिकेकडून ऍशले सेसानं गोल
केला.
****
No comments:
Post a Comment