Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 October 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ ऑक्टोबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
हवामान
बदलाचा सामना करण्यासाठी भारत वचनबद्ध-आयएसए अधिवेशनात राष्ट्रपतींचं प्रतिपादन
·
आठवा
वेतन आयोग स्थापन करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
·
अतिवृष्टीबाधितांसाठी
आणखी ११ हजार कोटी रुपये मदत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
·
छत्रपती
संभाजीनगर इथं अवैध कॉल सेंटरचा पर्दाफाश-सुमारे सव्वाशे तरुण ताब्यात
आणि
·
बंगालच्या
उपसागरात निर्माण झालेलं 'मोंथा' चक्रीवादळ अधिक तीव्र
****
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी
भारत वचनबद्ध असून त्या दिशेने ठोस पावलं उचलत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय सौर संघटना -
आयएसएच्या आठव्या अधिवेशनाला संबोधित करत होत्या. सूर्य हा सौर उर्जेचा शाश्वत
स्रोत महत्त्वाचा असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं. पुढचे चार दिवस
चालणाऱ्या या संमेलनात १२४ देशातले विविध विभागांचे प्रतिनिधी आणि ४० हून अधिक
देशांचे मंत्री सहभागी होत आहेत.
****
बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
या आयोगात एक अध्यक्ष, एक अंशकालीन सदस्य आणि एक सदस्य
सचिव असतील.
दरम्यान,
येत्या रबी हंगामासाठी फॉस्फरस आणि
पोटॅशयुक्त खतांसाठीच्या अनुदानित किमतींनाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी
दिली. याशिवाय, युरियाची
उपलब्धता वाढवण्यासाठी अमोनियम सल्फेट अनुदानित दरात उपलब्ध करून दिलं जाणार आहे.
****
विकसित महाराष्ट्र-२०४७ च्या
व्हिजन डॉक्युमेंटला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली.
राज्यातल्या नागरिकांकडून मतं आणि प्रतिसाद मागवून,
त्यांचं एआय-आधारित विश्लेषण करून
हे डॉक्युमेंट तयार करण्यात येणार आहे. यामध्ये राज्य आणि जिल्हा पातळीवरच्या १६
संकल्पना, तर
प्रगतीशील, शाश्वत
आणि सर्वसमावेशक सुशासन, याअंतर्गत १०० उपक्रम निश्चित करण्यात येणार आहेत.
अतिवृष्टीबाधितांसाठी सुमारे ११
हजार कोटी रुपये मदत देण्याला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. पुढच्या
पंधरा दिवसांत हा निधी आपदग्रस्तांच्या बॅक खात्यावर जमा होणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितलं. ते म्हणाले –
बाईट – मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन
ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या सुधारित खर्चाला तसंच राज्य शासनाच्या ५० टक्के
हिश्श्यानुसार जास्तीचा निधी देण्यालाही मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.
महापालिका,
नगरपरिषदा,
नगरपंचायती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती
तसंच औद्योगिक नगरींसाठीच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीत राखीव जागांवर निवडून
येणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत
देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. त्यासाठी संबंधित कायद्यांमध्ये
सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
सामान्य प्रशासन विभागांतर्गत
राजशिष्टाचार या उपविभागाचा विस्तार, परकीय थेट गुंतवणूक,
आंतरराष्ट्रीय संपर्क आणि परदेशस्थ
नागरिकांचे विषय, अशा तीन नवीन कार्यासनांची निर्मिती आणि या कार्यासनांसाठी
आवश्यक पदांना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
****
राज्यात बांधकामासाठी कृत्रिम
वाळूचा, म्हणजे
एम सँडचा वापर करण्याबाबत धोरण निश्चितीसंबंधीचा शासन आदेश आज जारी झाला.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबई इथं ही माहिती दिली. एम सँड युनिट
मंजुरीचा अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आला आहे.
****
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू
कडू हजारो समर्थकासह नागपुरातील जामठा परिसरात दाखल झाले आहेत. शेतकरी,
मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या हक्कांसाठी नागपूरमध्ये आज राज्यभरातील शेतकरी संघटना
महाएल्गार आंदोलन करत आहेत.
****
राज्यातील स्वायत्त संस्थांमार्फत
देण्यात येणाऱ्या अधिछात्रवृत्ती, शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वं निश्चित
करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने समिती नियुक्त केली आहे. या समितीचा
अहवाल प्राप्त झाल्यानंतर दहा दिवसात जाहिरात प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी दिले आहेत.
दरम्यान,
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या
शिष्यवृत्तीसाठी चालू वर्षाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० जूनपासून सुरु झाली आहे.
सर्व पात्र विद्यार्थ्यांची आवेदनपत्र महाविद्यालयांनी भरुन सहायक संचालक
कार्यालयात मंजूरीसाठी पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज
मुंबई इथं मंत्रालयात नांदेड जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीचा
आढावा घेतला. सिंचन प्रकल्पांचं काम वेगानं पूर्ण होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना
वेळेवर पाणी उपलब्ध व्हावं, यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी
दिल्या.
****
बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ
महामार्गासाठी अंबाजोगाई आणि परळी या दोन तालुक्यात मोजणीचं काम प्रगतीपथावर आहे.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ही माहिती दिली. दोन तालुक्यांतील चार गावांतील
मोजणी पूर्ण झाली असून आणखी चार गावांतील मोजणी प्रक्रिया पूर्णत्वाच्या मार्गावर
असल्याचं जॉन्सन यांनी सांगितलं.
****
माजी उपपंतप्रधान दिवंगत सरदार
वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त परभणी कृषी विद्यापीठ परिसरात वॉक
फॉर युनिटी पदयात्रा काढण्यात आली. पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी
पदयात्रेविषयी माहिती दिली, ते म्हणाले –
बाईट - रवींद्र सिंह परदेशी,
पोलीस अधीक्षक
****
छत्रपती संभाजीनगर इथं चिकलठाणा
औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय अवैध कॉल सेंटरचा पोलिसांनी
पर्दाफाश केला. काल मध्यरात्री केलेल्या या कारवाईत जवळपास १०० ते १२५ तरूण
तरूणींना ताब्यात घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. जळगाव रोडलगत असलेल्या
वोखार्ट कंपनीच्या पाठिमागे हे अवैध कॉल सेंटर सुरू होतं.
****
ज्येष्ठ साहित्यिक बाबू बिरादार
यांचं देगलूर इथं निधन झालं. बिरादार यांच्या ‘अंतःपुरुष’,
‘अग्निकाष्ठ’, ‘कावड’,
‘संभूती’ या कादंबऱ्यांनी मराठी
साहित्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. देगलूर तालुक्यात मंगाजीवाडी इथं
त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
या वादळाच्या पार्श्वभूमीवर खानदेश
आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे तसंच मराठवाड्यातले लातूर आणि धाराशिव
जिल्हे वगळता, सर्वत्र
आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे, विदर्भातल्या काही जिल्ह्यांना उद्या बुधवारी ऑरेंज
अलर्ट देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर तसंच जालना
जिल्ह्यात आज पावसाच्या सरी कोसळत आहेत. सततच्या पावसामुळे वेचणीला आलेल्या
कापसाचं नुकसान होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ
साहित्यिक, कलावंत
मानधन सन्मान योजनेसाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्हाधिकाऱी दिलीप स्वामी यांनी समिती गठीत केली आहे,
त्यात ज्येष्ठ लोककलावंत डॉ.
शेषराव पठाडे तसंच अन्य चौदा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान
टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. पाच सामन्यांपैकी
पहिला सामना उद्या कॅनबेरा इथं खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी
पावणेदोन वाजता सामना सुरू होईल.
****
No comments:
Post a Comment