Wednesday, 29 October 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.10.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 29 October 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज हरियाणातील अंबाला हवाई दल तळावरून राफेल विमानातून उड्डाण केलं. राष्ट्रपतींनी यापूर्वी एप्रिल २०२३ मध्ये आसाममधील तेजपूर हवाई दल तळावर सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानातून उड्डाण केलं होतं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक २०२५ मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला पंतप्रधान आज संबोधित करतील. ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचं अध्यक्षपदही ते भूषवणार आहेत.

****

महाराष्ट्र देशाचं डेटा सेंटर हब झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नीती आयोगानं पुणे इथं आज आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते. नवी मुंबई डेटा सेंटर कॅपिटल ठरले आहे. सरकार याच ठिकाणी इनोव्हेशन सेंटरची उभारणी करत आहोत, यासाठी जागतिक कंपन्यांनी रुची दाखवली आहे. मुंबई आणि पुणे उद्योगक्षेत्रावरील ताण कमी करत छत्रपती संभाजीनगर इलेक्ट्रॉनिक वाहन उत्पादनांच हब म्हणून विकसित करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

नवीन अंगणवाडी केंद्राची स्थापना करण्यासाठी लोकसंख्येनुसार सर्वेक्षण करून, अंगणवाडी, मदतनीस आणि सेविकांची नियुक्ती करण्यात यावी असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. तटकरे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दीडशे दिवसांच्या कामाचा आढावा घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या. पर्यवेक्षिका, जिल्हा पर्यवेक्षिका यांना ग्रामविकास विभागातून महिला आणि बालविकास विभागात वर्ग करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही तटकरे यांनी दिले. पुण्यात उभारण्यात येणाऱ्या अहिल्याभवन उभारण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करणे तसंच बालसंगोपन योजनेसंदर्भात तटकरे यांनी सूचना दिल्या.

****

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करावी, असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. मुंबई इथं मंत्रालयात काल आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून, लाभार्थी महिला स्वत:च्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करू शकतात, असं त्या म्हणाल्या.

****

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त नांदेडच्या राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात आज जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक विष्णू हारकळ यांच्या उपस्थितीत सप्ताहाला सुरूवात करण्यात आली. आगारातील कर्मचाऱ्यांना यावेळी भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ देण्यात आली.

****

फलटण जिल्हा रूणालयातील डॉ.संपदा मुंडे हत्या प्रकरणी बीड इथं आज आंदोलन करण्यात आलं. या प्रकरणाची एसआटी मार्फत चौकशी करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी या मागण्यांसाठी आंदोलकांनी बीड शहरातल्या टॉवरवर चढून आंदोलन केलं.

****

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग येत्या शनिवारी मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे १२ व्या आसियान आणि संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेला १५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि पुढील वाटचालीबद्दल आयोजित एका सत्राला राजनाथ सिंग संबोधित करतील. दोन दिवसांच्या दौऱ्यात राजनानाथ सिंग आसियान सदस्य आणि भागीदार देशांच्या संरक्षण मंत्र्यांसोबत आणि मलेशियाच्या सर्वोच्च नेतृत्वासोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. आसियान आणि आठ सहभागी देशांमधील संरक्षण सहकार्य मजबूत करणे हे परिषदेचे उद्दिष्ट असून दरवर्षी परिषद आयोजित केली जाते.

****

भारत आणि चीन यांनी परस्पर संबंधात स्थैर्य राखण्यासाठी सीमेवरील जमिनीसंदर्भातील वाद सोडवण्यासाठी विद्यमान यंत्रणांचा वापर सुरू ठेवण्यास सहमती दर्शविली आहे. नुकत्याच झालेल्या सीमा बैठक ठरावात हा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने आज यासंबंधी निवेदन प्रसिद्ध करुन ही माहिती दिली. दोन्ही बाजूंनी आपापल्या सीमावर्ती भागात शांतता राखण्याबद्दल बैठकीत चर्चा झाली.

****

भारतीय रेल्वेच्या उत्पादनात सप्टेंबर महिन्यापर्यंत मोठी वाढ झाली असल्याचं मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. रेल्वे इंजिन च्या उतपादनात २० टक्क्यांनी वाढ झाली असून ९३२ रेल्वे इंजिन तयार करण्यात आल्याचं याबाबतच्या आकडेवारीत म्हटलं आहे. कोचचे उत्पादन १६ पूर्णांक ६ टक्के, तर चाकांचे उत्पादन १४ टक्क्यांनी वाढले आहे मेक इन इंडियाया संकल्पनेमुळे राष्ट्रीय पायाभूत सुविधांच्या विकासात वाढ होत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

सध्या सुरू असलेल्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयातर्फे १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवल्या जात असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

No comments: