Monday, 11 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 11.02.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

११ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 नोएडा इथं आज पेट्रोटेक २०१९ या तेल आणि वायू विषयक तेराव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं पचारिक उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. अभिनवता आणि सहकार्यातून ऊर्जेच्या नवीन जगात पाऊल टाकणं, हा या परिषदेचा उद्देश आहे. ९५ पेक्षा जास्त देशांचे ऊर्जा मंत्री परिषदेत सहभागी झाले आहेत. इंधन तेल आणि नैसर्गिक वायू च्या क्षेत्रात भारतानं अलीकडेच केलेल्या विविध करारांचं सचित्र सादरीकरण या परिषदेत होणार आहे.

****



 जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त आज त्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. मानवतेप्रती पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा संदेश लोकांना नेहमी प्रेरणा देत राहील, त्यांनी एक उत्कृष्ट संघटनकर्त्याच्या रुपात परिश्रमी कार्यकर्त्यांची फळी तयार केल्याचं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्ष आजपासून समर्पण दिवस अभियान सुरु करणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.  

****



 पाच टक्के आरक्षणाच्या मागणीसाठी राजस्थानमधल्या गुर्जर समुदायाचं आंदोलन आजही सुरु आहे. सवाई माधोपूर जिल्ह्यातल्या मलारना डूंगूर इथं दिल्ली-मुंबई रेल्वेमार्ग अजूनही बंद असल्यानं, या मार्गावरच्या २६ रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. राज्याचे वरीष्ठ मंत्री विश्वेंद्र सिंह यांनी गुर्जर समुदायातल्या लोकांच्या तीस सदस्यांची एक समिती स्थापन केली असून, ही समिती आंदोलनकर्ते आणि सरकारमध्ये मध्यस्थी करेल.  

****



 लातूरच्या जनकल्याण निवासी विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाची काल सांगता झाली. विद्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या गणेश मंदिराचं कलशा रोहणासह, विद्यालयात दीर्घकाळ सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार तसंच विद्यालयाच्या स्मरणिकेचं प्रकाशनही यावेळी  करण्यात आलं.

*****

***

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 06 جولائی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 06 July 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...