आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१८ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.००
वाजता
****
जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात आज दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत
एका अधिकाऱ्यासह लष्कराच्या चार सैनिकांना वीरमरण आलं. दहशतवाद्यांसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या
संयुक्त पथकानं मध्यरात्रीपासून पिंगलीना इथं शोधमोहीम सुरु केली आहे. यावेळी
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या परिसरात जैश - ए - मोहम्मद
या दहशतवादी संघटनेचे दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची
माहिती, सुरक्षा सूत्रांनी दिली आहे. पुलवामा
जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, या
भागात अद्यापही चकमक सुरु आहे.
****
अर्जेंटीनाचे राष्ट्राध्यक्ष मौरिसिओ मॅक्री भारत
दौऱ्यावर आले असून, आज त्यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात
आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. मौरिसिओ
मॅक्री आणि पंतप्रधान मोदी यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा होणार आहे. मौरिसिओ मॅक्री
हे उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
****
शिवछत्रपती पुरस्काराचे यंदाचे विजेते
सलोनी सापले आणि महेश मांगावकर यांनी पुरस्कारात मिळालेली एक लाख रुपयांची रक्कम, हुतात्मा
जवान नीतिन राठोड आणि संजय राजपुत यांच्या कुटूंबांना देण्याची घोषणा केली आहे. जम्मू
काश्मीर इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातले हे दोन्ही जवान हुतात्मा
झाले.
****
कनिष्ठ वयोगट राष्ट्रीय हॉकी स्पर्धेला कालपासून
औरंगाबाद इथं सुरुवात झाली. हॉकी संघाचा माजी कर्णधार धनराज पिल्ले यांच्या हस्ते या
स्पर्धेचं उद्घाटन झालं. भारतीय क्रीडा प्राधिकरण -साईच्या मैदानावर ही स्पर्धा सुरु
आहे
****
लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या दर्पण पुरस्कारांचं
काल लातूर इथं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आलं. यावेळी
पत्रकार मुर्गाप्पा खुमसे, रामराव गोरे आणि झटिंग म्हेत्रे यांना जीवन गौरव पुरस्कार
तर, अनेकांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
*****
***
No comments:
Post a Comment