Monday, 23 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.09.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२३  सप्टेंबर  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 अकरावी प्रवेशासाठीच्या अंतिम फेरीला आजपासून सुरवात होणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ३० सप्टेंबरपर्यंत ही फेरी चालणार आहे. आतापर्यंत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश न घेतलेले, प्रवेश रद्द केलेले, आतापर्यंत कोणत्याही फेरीत प्रवेश न मिळालेले, प्रवेश नाकारलेले, तसंच दहावीच्या फेरपरीक्षेत एटीकेटी सवलत घेऊन उत्तीर्ण झालेले आणि नव्याने अर्ज भरलेले विद्यार्थीही या फेरीत सहभागी होऊ शकतील, असं प्रभारी शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांनी सांगितलं आहे.
****

 माजी क्रिकेटपटू आणि उद्योजक माधव आपटे यांचं आज मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. आपटे यांनी १९५२ ते १९५३ या कालावधीत ७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं  प्रतिनिधीत्व केलं होतं. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. १९५३ मध्ये मध्ये आपटे यांची पहिल्यांदा वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली. त्यावेळी ते पॉली उमरीगर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू ठरले. बीसीसीआयचे संस्थापक सदस्य, मुंबई चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आणि आपटे उद्योग समूहाचे प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केलं
****

 धुळे इथं काल झालेल्या ३६ व्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्याच्या अंतिम सामन्यात किशोर गटात उस्मानाबाद आणि किशोरी गटात पुण्याचा संघ विजयी झाला. किशोर गटाचा अंतिम सामना हा पुणे विरुद्ध उस्मानाबाद यांच्यात, तर किशोरी गटाचा अंतिम सामना नाशिक विरुद्ध पुणे यांच्यात झाला.
****

 छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, केरळ आणि त्रिपुरा राज्यांच्या विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी आज पोट निवडणूक होत आहे. छत्तीसगढमध्ये दंतेवाडा, उत्तरप्रदेशमध्ये हमीरपूर, केरळमध्ये पाला आणि त्रिपुरामढ्ये बधारघाट इथल्या जागांसाठी ही पोट निवडणूक होत आहे. नक्षलग्रसत दंतेवाडा भागात मतदारांच्या सुरक्षेसाठी जवळपास १८ हजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
*****
***

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 16 August 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छ...