आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
दिनांक २१ मार्च २०२१
****
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त
परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या कथित आरोपांच्या पार्श्वभूमीवर
त्यांच्या राजिनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे ठिकठिकाणी आंदोलन सुरू
आहे.
****
राज्यात
काल दोन लाख पाच हजार एकशे एकोणऐंशी जणांना कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लस
देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात काल चार हजार ९०५ जणांनी लस घेतली, बीड सहा हजार १६३,
हिंगोली एक हजार ३५८, जालना एक हजार ११, लातूर दोन हजार २०६, उस्मानाबाद एक हजार ८८०,
परभणी एक हजार ८४६ तर नांदेड जिल्ह्यात तीन हजार ७९३ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस
देण्यात आली.
****
मराठवाड्यात काल नव्या चार हजार २६२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३७
रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या
२०, नांदेड जिल्ह्यातल्या सात, जालना जिल्ह्यातल्या पाच,
बीड जिल्ह्यातल्या दोन, तर लातूर, परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे एक हजार सहाशे एकोणऐंशी रुग्ण काल आढळले. नांदेड जिल्ह्यात ९४७, जालना ५२०, परभणी ३२३, लातूर २८४, बीड २६५, उस्मानाबाद १२५ तर हिंगोली जिल्ह्यात
या संसर्गाचे ११९ नवे रुग्ण आढळून आले.
****
औरंगाबाद
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुरंगी निवडणुकीसाठी आज सकाळी नऊ ते दुपारी चार
वाजेदरम्यान मतदान होत आहे. उद्या या निवडणुकीचे निकाल घोषित केले जाणार आहेत.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आज होत असलेल्या परीक्षेमुळे औरंगाबाद शहरातली `स्मार्ट
शहर बस सेवा` सुरु राहणार आहे. शहरातल्या विविध मार्गांवर सकाळी सात ते नऊ आणि संध्याकाळी
पाच ते सात या वेळेत ही बससेवा सुरु ठेवण्यात आली आहे. परभणी
इथं १५ उपकेंद्रांवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येत आहे.
//************//
No comments:
Post a Comment