Friday, 11 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 11.06.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

११ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या २४ कोटी ५८ लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या. काल दिवसभरात ३० लाख ३२ हजारांहून अधिक नागरिकांना लस टोचण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

****

मुंबईत मालाड मालवणी इथं इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना, प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची, तसंच जखमीच्या उपचारांचा खर्च सरकारतर्फे करण्याची घोषणा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल जखमी रहिवाशांची, कांदिवली इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

****

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या निर्बंध काळात ७१ हजार परवानाधारक रिक्षाचालकांच्या बॅंक खात्यात, सानुग्रह अनुदान जमा करण्यात आल्याचं, परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. अनुदान मिळण्यासाठी आतापर्यंत दोन लाख ६५ हजार ४६५ रिक्षा चालकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत.

****

राज्यातल्या पोलिसांसाठी विशेष गृहनिर्माण धोरण तयार करण्याला काल तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. मुंबईझालेल्या बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. पोलिसांना त्यांच्या हक्काचं घरं मिळवून देण्यासाठी, नगरविकास विभाग विशेष धोरण तयार करत असून, लवकरच त्याला अंतिम स्वरूप देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडलं जाईल, असं शिंदे यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद शहरातल्या नियोजित चिकलठाणा जिल्हा क्रीडा संकुलाच्या संरक्षक भिंतीचं काम तत्परतेनं पूर्ण करण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल या संदर्भात आयोजित एका बैठकीत दिले. क्रीडा प्रकारांसाठी सभागृह, संकुलाकडे येणाऱ्या रस्त्याचं बळकटीकरण करुन अंतर्गत बांधकाम सुरू करावं, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

****

नवी मुंबईत उभारण्यायेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटिल यांचं नाव देण्यात यावं, या मागणीसाठी काल नवी मुंबईत, २९ गावं आणि १२ पाडे यांच्यावतीनं मानवी साखळी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात, हजारो स्थानिक प्रकल्पग्रस्त पारंपरिक वेषात सहभागी झाले होते.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.04.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...