आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ नोव्हेंबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
विकसनशील देशांकडून विकासकामांसाठी होणारं पर्यावरणाचं कधीही भरून न येणाऱ्या नुकसानीबाबत
एक सहाय्यता निधी उभारण्याचा निर्णय, कॉप 27 या संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेत घेण्यात आला. हा निधी उभारण्यासाठी एकमतानं
करार करण्यात आला. काही देशातल्या विकास प्रकल्पांमुळे पर्यावरणाचं आणि पृथ्वीचं कधीही भरुन न येणारं नुकसान होतं, त्यासाठीची नुकसानभरपाई म्हणून या निधीची
स्थापना करण्यात आली आहे.
****
आज जागतिक मत्स्यपालन दिवस आहे. जागतिक मत्स्यपालनाच्या व्यवस्थापन पद्धतीमध्ये
‘शाश्वत साठा आणि निरोगी परिसंस्था सुनिश्चित करण्यासाठी’
बदल करण्याकरता हा दिवस पाळण्यात येतो. निरोगी सागरी परिसंस्था आणि शाश्वत
मत्स्यपालनाच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या
वतीनं दमण इथं हा दिवस साजरा केला जाणार आहे.
****
जी ट्वेंटीचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भारत आता जी पी ए आय अर्थात 'जागतिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स भागीदारी' समूहाच्या अध्यक्षपदाची
जबाबदारी सांभाळणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा माध्यमातून
मानव केंद्रीत विकास करण्यावर जी पी ए आय चा भर आहे.
****
पुण्यात नवले पुलावर टँकरच्या धडकेनं काल रात्री झालेल्या अपघाताविषयी मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी पोलिसांकडून माहिती घेतली. हा अपघात कोणाच्या निष्काळजीपणामुळे झाला
त्याचा तपास करा आणि जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी
प्रशासनाला दिल्या आहेत. कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यानं ४८ वाहनं एकमेकांना धडकून हा अपघात झाला. या अपघातात किमान पन्नास जण जखमी झाल्याचं
वृत्त आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं काल क्रांतीसुर्य बिरसा मुंडा
यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्तानं भव्य मिरवणूक काढण्यात आली. आदिवासी युवक
कल्याण संघाचे अध्यक्ष डॉ. सतीष पाचपुते यांच्या पुढाकारातून
हा सोहळा घेण्यात आला.
****
कतार
इथं फिफा - फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला काल सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात इक्वेडोरनं
यजमान कतारचा दोन - शून्य असा पराभव केला.
//*********//
No comments:
Post a Comment