आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ सप्टेंबर २०२३ सकाळी ११.००
वाजता
****
नारी शक्ती वंदन विधेयक संमत झाल्याबद्दल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या १४० कोटी जनतेचं अभिनंदन केलं आहे. सामाजिक
संपर्क माध्यमांद्वारे त्यांनी या संदर्भातली भावना व्यक्त केली असून या विधेयकाला
समर्थन देणाऱ्या राज्यसभेच्या सगळ्या सदस्यांचे पंतप्रधानांनी आभार मानले आहेत.
****
हेतुपुरस्सरपणे कर्जाची परतफेड न
करणाऱ्यांवर कारवाईसंबंधीच्या निर्देशांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव भारतीय रिझर्व्ह
बँकेनं सरकारला दिला आहे. नवीन निर्देशांनुसार कोणतंही खातं अकार्यक्षम मालमत्ता झाल्याच्या
सहा महिन्यांत कर्ज न फेडणाऱ्यांना जाणीवपूर्वक कर्जबुडवणारे मानण्यात येईल आणि असे
लोक पुन्हा कर्जासाठी पात्र नसतील.
****
पंचवीस अतिरेक्यांचं प्रत्यार्पण
आणि कारवाईबाबत भारतानं केलेल्या मागणीबाबत कॅनडा सरकार उदासीन आहे. भारत या संदर्भात
दीर्घ काळापासून पाठपुरावा करत आहे.
****
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दूरचित्रवाणी
वाहिन्यांसाठी एक सूचनापपत्र जारी केलं आहे. या सूचनापत्राद्वारे मंत्रालयानं, दहशतवादासह इतर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत किंवा कायद्यानं
प्रतिबंधित असलेल्या संघटनांशी संबंध आहे अशांना कोणताही मंच देणं टाळावं, असं सांगण्यात आलं आहे.
****
सैफ करंडक विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत
भारताच्या १९ वर्षाखालील संघानं आज नेपाळमध्ये काठमांडू इथं झालेल्या सामन्यात बांग्लादेशचा
३-० असा सहज पराभव केला. भारताचा या गटातला पुढचा सामना येत्या सोमवारी भूतानसोबत होणार
आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या
तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज मोहाली इथं होणार आहे.
पंजाब क्रिकेट संघटनेच्या आयएस बिंद्रा क्रीडा संकुलात खेळवला जाणारा हा सामना दुपारी
दीड वाजता सुरू होईल.
****
No comments:
Post a Comment