Wednesday, 21 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.08.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२१  ऑगस्ट  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 काँग्रेस नेते पी चिंदबरम् यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येईपर्यंत जबरदस्तीने काहीही कारवाई करू नये, असं चिदंबरम यांच्या वकीलांनी म्हटलं आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयचं पथक आज सकाळी पुन्हा चिदंबरम यांचा शोध घेत, त्यांच्या निवासस्थानी दाखल झालं, त्यावेळी चिदंबरम यांच्या कायदे सल्लागारांच्या पथकानं सीबीआयच्या पथकाला ही विनंती केली. दरम्यान चिदंबरम या निवासस्थानी नसल्यानं, सीबीआय पथकाला रिकाम्या हाताने परतावं लागलं.

 आयएनएक्स मिडिया घोटाळाप्रकरणी चिदंबरम यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर, काल त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या सीबीआयच्या पथकाला ते कुठंच सापडले नाहीत. त्यामुळे दोन तासात सीबीआयपुढं हजर व्हा, अशी नोटीस त्यांच्या घरावर चिकटवून या पथकाला परत यावं लागलं. चिदंबरम अर्थमंत्री असताना २००७ मधे आयएनएक्स या माध्यमसमूहाला ३०५ कोटी रुपयांचा परदेशी निधी स्वीकारण्यासाठी परवानगी देण्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
****

 सातारा जिल्हात कराड इथला कुख्यात गुंड पवन सोळवंडे याची, चार अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या घरात घुसून बेछूट गोळीबार करून हत्या केली. या घटनेनंतर कराड शहर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. हल्लेखोर स्थानिक असावेत असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
****
 अमरावती इथं धनुर्विद्या अकादमीसाठी निधी उभारण्याचं आश्वासनकेंद्रीय क्रीडा आणि युवक व्यवहारमंत्री किरण रिजिजू यांनी दिलं आहे. ते काल अमरावती इथं अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते. मल्लखांबासारख्या पारंपरिक खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं, रिजिजू यांनी यावेळी सांगितलं.
****

 जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात भारताच्या बी साई प्रणितनं दक्षिण कोरियाच्या ली डाँग केऊन याचा २१-१६, २१-१५ असा पराभव करून उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. एच.एस प्रणॉनही पाचवेळच्या जागतिक विजेत्या लीन डॅन याचा पराभव करून आगेकूच केली.
*****
***

No comments: