आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०३ सप्टेंबर २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या रायगड जिल्ह्यातल्या
उरण इथल्या प्रकल्पाला आज सकाळी आग लागली, या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला,
तर अनेक जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या २२ बंबांनी सुमारे दोन तासाच्या प्रयत्नानंतर
आगीवर नियंत्रण मिळवल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
अमेरिकी बनावटीची अपाचे ए एच
६४ हेलिकॉप्टर्स आज भारतीय वायुदलात सामील करण्यात आली. आज सकाळी पंजाबात पठाणकोट इथल्या
वायुसेनेच्या तळावर झालेल्या एका कार्यक्रमात वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी.एस.धनोआ
यांच्या उपस्थितीत ही आठ हेलिकॉप्टर्स वायूसेनेत दाखल झाली.
यामुळे वायूसेनेची ताकद वाढल्याचा विश्वास धनोआ यांनी व्यक्त केला. भारतीय वायुसेनेनं
२०१५ मध्ये अमेरिका सरकार आणि बोइंग कंपनी सोबत २२ हेलिकॉप्टर खरेदी करण्यासंदर्भात
करार केला आहे.
****
शेतकरी संघटना आज आपल्या विविध मागण्यांसाठी
राज्यव्यापी धरणे आंदोलन करत
आहे. सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी बारा वाजेपासून
चार वाजेपर्यंत हे आंदोलन
करण्यात येईल. संपुर्ण कर्जमुक्ती,
तंत्रज्ञान स्वातंत्र्य, आणि व्यापार स्वातंत्र्य या प्रमुख तीन मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्या आलं आहे.
****
लातूर जिल्हा परिषदेनं जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार
काल जाहीर केले. प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे १० प्राथमिक शिक्षक, ५ माध्यमिक
शिक्षक, क्रीडा- कला यातून एक शिक्षक आणि ५ शिक्षकांना विशेष पुरस्कार अशा एकूण २१
शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत, परवा पाच सप्टेंबरला शिक्षकदिनी या पुरस्कारांचं
वितरण केलं जाणार आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेची नांदेड -औरंगाबाद-नांदेड ही
नवीन विशेष गाडी आजपासून सुरू झाली आहे. येत्या तीस सप्टेंबरपर्यंत ही गाडी चालवली
जाणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment