Tuesday, 4 August 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 04.08.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ०४ ऑगस्ट २०२० सकाळी ११.०० वाजता

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ९८ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले. यात महानगरपालिका हद्दीतल्या ३६ तर ग्रामीण भागातल्या ६२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आता कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या चौदा हजार ९९२ झाली आहे. यापैकी अकरा हजार २२९ रूग्ण बरे झाले आहेत तर ४८७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या तीन हजार २७६ रूग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

****

सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी, मुख्य वित्त अधिकाऱ्यांसह ९ जण कोरोना विषाणूनं बाधित झाले आहेत. सांगली जिल्हा परिषदेतील कोरोना विषाणू बाधितांचा आकडा आता ४० वर गेला आहे. सध्या सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातलं कामकाज अनिश्चित कालावधीसाठी बंद आहे.

दरम्यान, सांगली इथल्या जिल्हा कारागृहातल्या आणखी २२ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. यात १९ कैदी आणि ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत सांगली कारागृहात एकूण ८५ जण पॉझिटिव्ह आहेत.

****

मुंबई आणि उपनगर परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे दादर, हिंदमाता, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली बोरीवली आदी भागात पाणी साचलं आहे. दादर आणि परळ भागात पाणी साचल्याने त्या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पावसाची संततधार कायम असल्याने पाण्याचा निचरा होऊ शकत नाही. कांदिवली परिसरात मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या डोंगराचा काही भाग कोसळला आहे. यामुळे एकेरी वाहतूक ठप्प झाली असून, हा ढिगारा हटवण्याचं काम सध्या सुरू आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेलाही या पावसाचा फटका बसला आहे.

दरम्यान, संततधार पाऊस आणि भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातल्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना बंद ठेवण्याचं आवाहन महानगरपालिकेने केलं आहे

****

२०१९-२० या आर्थिक वर्षातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या थकीत अनुदानासाठी ३० कोटी ९३ लाख ७५ हजार रुपयांचा निधी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास वितरीत आणि खर्च करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली आहे. याचा लाभ राज्यातल्या १२ हजार १४४ सार्वजनिक ग्रंथालयांना मिळणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...