Thursday, 23 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 February 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ फेब्रुवारी २०१ दुपारी .००वा.

*****

राज्यात दोन टप्प्यात पार पडलेल्या, दहा महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा, आणि २८३ पंचायत समित्यांच्या मतदानाची मतमोजणी सुरु आहे. यात मराठवाड्यातल्या आठ जिल्हा परिषदांचे ४६० गट, आणि शहात्तर पंचायत समित्यांच्या ९३० गणांचा समावेश आहे. काही ठिकाणचे निकाल हाती आले असून, सायंकाळपर्यंत सर्व निकाल हाती येण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार शिवसेनेला पाच, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन, भाजपला तीन आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या.   

पाचोड गटातून शिवसेनेचे विलास भुमरे, पैठण तालुक्यातल्या आपेगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण काळे, तर सिल्लोड तालुक्यातल्या अजिंठा गटातून काँग्रेसच्या जिजाबाई गव्हाणे विजयी झाल्या.

नांदेड जिल्हा परिषदेमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस पक्षाला १५, भारतीय जनता पक्षाला ६, शिवसेनेला ३, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ३ जागा मिळाल्या आहेत.

सोनखेड गटातून काँग्रेसच्या अंकिता मोरे, हादुरपूर गटातून भाजप उमेदवार संध्या धोंडगे, भोकर तालुक्यात पिंपळढव गटातून भाजप उमेदवार, पाळज गटातून भाजपाचे सुरकुंटवाड दिवाकर नारायण रेड्डी, गोरठा गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगिता जाधव, आरळी गटातून भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मण ठक्करवाड, खानापूर गटातून काँग्रेसच्या अनुराधा पाटील, येळेगाव गटातून बबनराव बारसे, करखेली गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय रेड्डी, हिमायतनगर तालुक्यातल्या सरसम जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या ज्योत्स्ना नरवाडे विजयी झाल्या.

देगलूर तालुक्यात बन्नाळी पंचायत समिती गणातून भाजपच्या संगीता दोसलवार, नांदेड      तालुक्यात वाडी इथून काँग्रेसच्या शिला निखाते, किनवट तालुक्यात उमरी इथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनयना जाधव, लोहा तालुक्यात वडेपुरी इथून शिवसेनेच्या प्रणीता देवरे, नायगांव तालुक्यात बरबडा पंचायत समिती गणातून काँग्रेसच्या विजयश्री कमतेवाड विजयी झाल्या.

        शिराढोण गटातून शिवसेना उमेदवार प्रवीण पाटील, तळेगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ललिता यल्लमगोंडे, बऱ्हाळी गटातून काँग्रेसच्या मंगराणी अंबुलगेकर, वाई गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे समाधान राठोड, उमरी गटातून शिवसेनेच्या संगीता गायकवाड, वाझेगाव गटातून काँग्रेसचे मनोहर पाटील शिंदे  विजयी झाले. पंचायत समितीच्या कृष्णूर गणातून काँग्रेसच्या उमेदवार वंदना, ४९६ मतांनी विजयी झाल्या, तर धानोरा पंचायत समिती गणातून पल्लवी मुंगाळ, वाझेगाव गणातून हसीना बेगम तर विष्णुपुरी पंचायत समिती गणातून गोविंद जाधव विजयी झाले आहेत.

परभणी  जिल्हा परिषदेच्या रावराजूर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्वती वाघमारे तर पेठशिवणी गटातून मित्रमंडळाचे भरत घनदाट विजयी झाले.

जालना जिल्ह्यातल्या वाटूर जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाच्या छाया माने, रांजणी गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगासागर वरखेडे, तर वरूड जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे उत्तम सिताराम वानखेडे विजयी झाले.

बीड जिल्हा परिषदेमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला १४, भाजपला सहा, शिवसेनेला दोन, काँग्रेसला दोन जागा मिळाल्या.

गेवराई तालुक्यातल्या चकलांबा गटात जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष विजयसिंह पंडित विजयी झाले.

उस्मानाबाद जिल्ह्यात ढोकी इथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीना माळी, पलसप इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय देवुलकर, तेर इथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील, येडशी इथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सारिका वाघ तर कोंड इथून सुरेखा येरकल  विजयी झाल्या.

लातूर जिल्हा परिषदेमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसला सात, भाजपला तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळाल्या.

****

औरंगाबादच्या रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे आज रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी साडे दहा वाजता व्यवसाय मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्राच्या सभागृहात मेळाव्याचं उद्घाटन झालं. या मेळाव्यात विविध पदाच्या एकूण ४०५ जागांसाठी दहावी, बारावी, पदवीधर उमेदवार, आयटीआय, डिप्लोमाधारक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत.

****

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत जैविक कीड नियंत्रण आणि जैविक खते प्रयोगशाळांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनानं मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. यासाठी २०१९ पर्यंत एकूण नऊशे ४५ लाख रकमेच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. राज्यात सध्या १० जैविक कीड नियंत्रण आणि जैविक खते प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

****

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्व चाचणी २० मार्च पासून घेतली जाणार आहे. व्यक्तिमत्व चाचणीच्या तारखा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर केल्या जाणार असल्याचं, आयोगानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

//*****//

No comments: