Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29
September 2018
Time 1.00
to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९
सप्टेंबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
ज्ञाना शिवाय समाज, देश आणि जीवनाची
कल्पना करता येणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली
इथं आज पुनरुत्थानासाठी शैक्षणिक नेतृत्व या विषयावरच्या परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर
ते बोलत होते. भविष्यातल्या भारतासाठी अशा विषयावर चर्चा आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
प्रत्येक व्यक्तीचा संतुलित विकास करणं हा शिक्षणाचा उद्देश असून, ज्ञानासोबतच नवकल्पनांचीही
गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकार शिक्षण क्षेत्रात ज्ञानासोबतच गुंतवणुकीवरही
लक्ष केंद्रीत करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. शिक्षणाचा ठराविक उद्देश असल्याशिवाय
त्याचा उपयोग होत नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. भारतीय शैक्षणिक प्रणालीला भेडसावणाऱ्या
आव्हानांवर चर्चा करणं, आणि शैक्षणिक फलनिष्पत्ती तसंच या क्षेत्रातलं नियमन या दोन्हींमध्ये
मोठे बदल घडवीण, आराखडा तयार करणं हा या परिषदेचा उद्देश आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात
परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्याच्या उद्देशानं सरकार करत असलेल्या
प्रयत्नांचा हा एक भाग आहे.
****
देशभरात जमावाकडून होणार्या हिंसेविरोधात गंभीर कायदेशीर
कारवाई होऊ शकते, असा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा, अशी
सूचना केंद्र सरकारनं राज्यांना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अशा
जमावाकडून होणाऱ्या हिंसाचाराच्या
घटनांची पडताळणी करावी, रेडीयो, दूरदर्शन तसंच इतर माध्यमातून जमावाकडून
होणाऱ्या हिंसेवरच्या
गंभीर कारवाईबाबत जागृती करावी, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं दिल्या आहेत. प्रत्येक
जिल्ह्यात पोलिस निरीक्षक स्तरावरचा अधिकारी नियुक्त करुन विशेष पथक नेमून समाज माध्यमांवरचे
मजकुरावर लक्ष ठेवावं, अशा सूचनाही गृहमंत्रालयानं राज्यांना दिल्या आहेत.
****
परराष्ट्र
व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आज संध्याकाळी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या
सर्वसाधारण सभेत ७३ व्या सत्राला संबोधित करणार आहे. संयुक्त राष्ट्र संघामध्ये मंगळवारपासून
विविध विषयावर वादविवाद कार्यक्रमांना सुरूवात झाली असून येत्या सोमवारपर्यंत हे कार्यक्रम
सुरू राहणार आहेत. सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर अयोजित सार्क बैठकीत बोलताना स्वराज
यांनी, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा समूळ नाश करण्याची गरज व्यक्त केली. पाकिस्तानचे
परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्या उपस्थितीत स्वराज यांनी दक्षिण
आशियाच्या आर्थिक विकास आणि शांततेसाठी सार्क देशांच्या सहाकाऱ्याची आवश्यकता असल्याची
गरज व्यक्त केली.
****
आर्थिक व्यवहार विभागाचे
सचिव एस सी गर्ग यांनी देशाच्या एकूण कर्ज घेण्याच्या अंदाजामध्ये ७० हजार कोटी रुपयांच्या
कपातीची घोषणा केली आहे. तसंच सरकारनं आर्थिक तूट ही तीन पूर्णांक तीन दशांश टक्क्यांपर्यंत
टिकवण्याचं लक्ष्य ठेवलं असल्याचं गर्ग यांनी सांगितलं. आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सत्रामध्ये
गेल्या सहामाहीच्या दोन लाख ८८ हजार कोटींच्या तुलनेत सरकार या सहामाहीमध्ये फक्त दोन
लाख ५० हजार कोटी रुपये एवढेच कर्ज घेणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
दहा ट्रीलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेपर्यंत
पोहोचण्याची भारताची क्षमता असून, या मार्गात असलेले अनावश्यक आणि उनुत्पादित नियम
रद्द करण्याची गरज असल्याचं उद्योग आणि वाणिज्य मंत्री सुरेश प्रभु यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. अनावश्यक नियम शोधून ते रद्द
करण्याच्या दृष्टीनं उद्योग धोरण विभागाच्या सविचांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली
असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्योग जगतानंही असे नियम लवकरात लवकर शोधून निदर्शनाला
आणून द्यावे, असं आवाहन प्रभू यांनी यावेळी केलं. उद्योगांचं सुलभीकरण करण्यात भारतानं
मोठी प्रगती केली असून, याचा परिणाम जिल्हास्तरावरही दिसत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
सरकार, खाजगी संगीत संस्था, सभा
आणि गुरुजन या सगळ्यांनीच संगीत क्षेत्राच्या वाढीसाठी प्रयत्न करायला हवेत, असं
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. सुप्रसिद्ध गायिका एम एस सुब्बलक्ष्मी
यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. यावेळी संगीत क्षेत्रातल्या
५० उदयोन्मुख कलाकरांना फेलोशिप देण्यात आली. राज्यपाल सी विद्यासागर राव, मंत्री
प्रकाश मेहता यावेळी उपस्थित होते.
****
जालन्याचे पोलिस अधीक्षक एस़ चैतन्य यांनी काल संदीप
राठोड आणि आतिष चौधरी या दोन पोलिस कर्मचार्यांना निलंबित केलं आहे. घनसावंगी पोलिस
ठाण्याअंतर्गत कार्यरत या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी हॉटेल मालकानं जेवणाच्या बिलाचे
पैसे मागितले म्हणून हॉटेलातल्या साहित्याची तोडफोड करून मारहाण केली होती. दरम्यान,
वाळू माफियांशी संबंध ठेवणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांचंही पोलीस अधीक्षकांनी दोन दिवसांपूर्वीच
निलंबन केलं होत.
*****
***
No comments:
Post a Comment