Tuesday, 23 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.04.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

मराठी बातमीपत्र

२३ एप्रिल  २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघात पहिल्या दोन  तासांत सरासरी आठ पूर्णांक २१ टक्के मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. नऊ वाजेपर्यंत औरंगाबाद आणि जालना तसंच रायगड, बारामती, हातकणंगले, रावेर इथं प्रत्येकी नऊ टक्के मतदान झालं आहे. जळगाव, अहमदनगर इथं प्रत्येकी आठ टक्के मतदान झालं. पुण्यात सहा टक्के तर कोल्हापूर इथं दहा टक्के मतदान झालं आहे. रत्नागीरी- सिंधुदूर्ग इथं पहिल्या दोन तासांत अकरा टक्के मतदानाची नोंद झाल्याचं वृत्त आहे.

 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेसाठी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदान करावं असं आवाहन केलं आहे. तुमचं मत मौल्यवान आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये देशाची दिशा ठरवण्यास सहायक राहील, असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.



 आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद इथं आपला मतदानाचा हक्क बजावला.

****



 देशातल्या १३ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ११६ मतदारसंघात आज मतदान होत आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालेल. या निवडणुकीत राज्यात विविध राजकीय पक्षांचे १९ महिलांसह २४९ उमेदवार आपलं भवितव्य आजमावत आहेत. राज्यातले सुमारे दोन कोटी सत्तावन्न लाख मतदार, आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

****



 औरंगाबाद शहरात काही ठिकाणी तासभर उशिरा मतदान प्रक्रिया सुरू झाली. हर्सूल परिसरातील दोन मतदान केंद्रांवर मतदान यंत्र बंद पडली तर मध्यवर्ती नाका इथल्या केंद्रावर क्रमांक नसल्यानं मतदानासाठी आलेल्या मतदारांचा गोंधळ उडाला होता, त्यामुळं या ठिकाणी तासभर उशिरानं मतदानाला सुरुवात झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे.  शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार, खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगपुरा इथं जिल्हापरिषद कार्यालयात मतदान केलं.



 कन्नड सुमारे ९,औरंगाबाद मध्य ६, औरंगाबाद पूर्व सात , औरंगाबाद पश्चीम १० तर गंगापूर १० आणि वैजापूर सुमारे ७ टक्के मतदान झालं आहे.

****



 लोकसेभेच्या निवडणुकीसाठी उर्वरित टप्प्यातला प्रचार शिगेला पोहचत आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते देशभरात ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. ओडिसातल्या केंद्रपाडा आणि बालासोर इथं तर पश्चिम बंगालमधल्या आसनसोल इथं यासभा आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी राजस्थान आणि मध्य प्रदेशात प्रचारसभा घेणार आहेत. बसपा अध्यक्ष मायावती उत्तरप्रदेशात फरुखाबाद आणि हडोई इथं प्रचार सभा घेणार आहेत.  

****



 निवडणूक आयोगानं आदर्श अचारसंहितेचं उल्लंघन केल्या प्रकरणी काँग्रस नेता आणि पंजाबचे मंत्री नवजोत सिंह सिध्दू यांच्यावर ७२ तास निवडणूक प्रचारासाठी प्रतिबंध घालण्यात आली आहे. आज सकाळपासून या बंदीला सुरुवात होणार आहे. या आधी बिहारच्या कटिहार जिल्ह्यातल्या प्रचार फेरीच्या वेळी धार्मिक आधारावर मत मागितल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

****



 आशियाई बँडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आजपासून चीनच्या वुहान इथं सुरू होत आहे. ही स्पर्धा २८ तारखेपर्यंत चालेल. या स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये किदंबी श्रीकांत आणि समीर वर्मा तसंच महिला एकेरीत पी. वी. सिंधू आणि सायना नेहवाल भारताचं प्रतिनिधित्त्व करणार आहेत.



दरम्यान, दोन प्रमुख खेळाडू एच. एस. प्रणय आणि बी. साई प्रणित यांनी भारतीय बॅडमिंटन संघाच्या चुकीमुळं त्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली नसल्याचा आरोप केला आहे. बॅडमिंटन संघटनेनं या आरोपांचं खंडण केलं आहे.

****



 आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघानं राजस्थान रॉयल्स संघाला काल सहा गडी पराभव केला. नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं २० षटकात सहा बाद १९१ धावा केल्या. हे आवाहन दिल्ली कॅपिटल्सनं चार चेंडू राखून पूर्ण केलं. आज चेन्नई इथं सनराइजर्स हैदराबादचा सामना चेन्नई सुपरकिंग्जस विरुद्ध होणार आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...