Friday, 20 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 20.12.2019 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 २० डिसेंबर २०१ सकाळी ११.०० वाजता

****

ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात अंतिम संस्कार होणार आहेत. लागू यांचा पार्थिव देह आज सकाळपासून पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला असून, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रासह समाजाच्या सर्वच क्षेत्रातल्या नागरिकांनी लागू यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली आहे. लागू यांचं मंगळवारी रात्री वयाच्या  ब्याण्णवाव्या वर्षी निधन झालं.

****

जालना जिल्ह्यातून धुळ्याकडे जाणाऱ्या एका ट्रकमधून दोन कोटींचा रुपये किमतीचा, सुमारे चारशे किलो गांजा जप्त करण्यात  आला आहे. मंठ्याचे पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी मध्यरात्री ही कारवाई केली. केरळच्या तिरुअनंतपुरम इथून निघालेला ट्रक जालना जिल्ह्यातल्या मंठा मार्गे धुळ्याकडे जात असल्याची पोलिसांना माहिती मिऴाली होती, पोलिसांनी सापऴा रचून ही कारवाई केली. चालक संजय सिंघल याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, तो वैजापूर इथला रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

****

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी आज हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान सकाळी साडे सहाच्या सुमारास कळमनुरी इथल्या भाजीमंडी जवळ जुना बस स्थानक परिसरात अज्ञातांनी एका बसवर दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या तर दुसऱ्या बसवर दगडफेक करत बस जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोन बसचं नुकसान झालं असून अनेक प्रवासीही जखमी झाल्याचं वृत्त आहे. 

****

झारखंडमधे विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. अखरेच्या टप्प्यात १६ मतदारसंघांसाठी मतदान होत आहे. नक्षलग्रस्त मतदारसंघांमधे सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत तर इतर ११ मतदारसंघांमधे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान चालेल. मुक्त, निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान होण्यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर केंद्रीय निमलष्करी दलाचे जवान तैनात केले आहेत. तसंच राज्यसरकारचे ४१ हजाराहून अधिक सशस्त्र सुरक्षा दलाचे जवानही तैनात केले आहेत.

****


No comments:

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 10 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...