Saturday, 20 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.06.2020 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 २० जून २०२० सकाळी ११.०० वाजता
****

 देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या तीन लाख पंच्च्यान्नव हजार अठ्ठेचाळीस झाली आहे. गेल्या चोवीस तासांमधे आता पर्यंतचे सर्वाधिक चौदा हजार पाचशे सोळा रुग्ण वाढले आहेत.
****

 देशात गेल्या चोवीस तासांमधे कोरोना विषाणूमुळे तिनशे पंच्च्याहत्तरजण मृत्यूमुखी पडले आहेत. आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता बारा हजार नऊशे अठ्ठेचाळीस झाली आहे.
****

 औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी एकशे दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या आता तीन हजार तीनशे चाळीस झाली आहे.
****

 औरंगाबाद जिल्ह्यातील सतराशे एक्क्याऐंशी रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या एकशे एकोणऐंशी झाली आहे.
****

 नांदेड शहरातील पिरबुऱ्हान नगर भागातील एका रुग्णाचा आज कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. आता जिल्हयात कोरोनाविषाणू संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या चौदा झाली आहे.
****

 लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेउपचार घेत असलेल्या कोरोना विषाणूच्या रुग्णाला महागडं औषध बाहेर आनण्याची शिफारस केल्यानं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण संचालकांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना कारणं दाखवा नोटीस बजावली आहे.
****

 जालना शहरात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्याचं नियम न पाळणाऱ्या १०९ तसंच सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या ४३ नागरिकांवर काल दंडात्मक कारवाई करण्यात आली. नगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत ४५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
****

 हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी शिवारात ओढ्यावरच्या काठावरील रस्त्यानं जात असलेलं एक दांपत्य काल संध्याकाळी पाण्याचा प्रवाह वाढल्यानं बैलगाडीसह वाहून गेलं.
****

 औरंगाबाद इथल्या मध्यवर्ती कारागृहातला न्यायाधीन बंदी इमरान आमीर बेग पळून गेल्यामुळे रक्षक प्रभाकर कांबळे आणि राहुल राठोड यांना निलंबित करण्यात आलं असून संबंधित डॉक्टरांविरुद्ध शिस्तबंधाच्या कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. 
*****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 11 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...