Tuesday, 5 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.02.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०५ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीत कोलकाता पोलीस आणि पश्चिम बंगाल सरकार अडथळे आणत असून पुरावे नष्ट करत आहे, असा आरोप करणारी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज सुनावणीला ठेवली आहे. या चौकशीत कोलकाता पोलीस अडथळे आणत असल्यानं असामान्य स्थिती उद्भवली असल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी काल याचिका दाखल करताना म्हटलं आहे. 

****



 दरम्यान, पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्रीय अन्वेषण विभाग -सीबीआय यांच्यात सुरू असलेल्या वादाचे पडसाद काल संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे काल संसदेचं कामकाज झालं नाही. आज दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषभावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

****



 मुंबई -पुणे महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला न दिल्यानं रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची नोटीस बजावली आहे. १८ वर्षे होऊनही शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यामुळे  शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली असता, जिल्हा न्यायालयानं चार कोटी ७० लाख रूपये देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काल जप्तीची नोटीस बजावली. जप्तीची नामुष्की टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं तीस दिवसांची मुदत मागितली आहे.

****



 प्रत्येक जिल्ह्यात २१ तारखेपूर्वी शांती मोर्चे काढण्याचं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते काल लातूर इथं आयोजित सभेत बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेली स्थिती, अयोध्येतलं राम मंदीर, या आणि इतर मुद्यांवरून त्यांनी सरकारवर टीका केली. लातूर लोकसभा मतदारसंघासाठी निवृत्त गटशिक्षणाधिकारी राम गारकर यांची उमेदवारी यावेळी जाहीर करण्यात आली.

****



 फरार आर्थिक आरोपी विजय मल्ल्या याचं भारताला प्रत्यार्पण करण्याला इंग्लंडनं मंजुरी दिली आहे. इंग्लंडच्या गृहमंत्र्यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. भारतानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे, मात्र या आदेशाविरुद्ध तिथल्या न्यायालयात याचिका करणार असल्याचं मल्ल्या यांनी म्हटलं आहे.

*****

***

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 09 جولائی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 09 July-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...