Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 June 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ जून २०२० दुपारी १.०० वा.
****
देशात
कोविडग्रस्तांचं बरे होण्याचं प्रमाण ५२ पूर्णांक ८० शतांश टक्क्यांपर्यंत पोहोचलं
आहे. सध्या देशात कोविडग्रस्तांची संख्या तीन लाख ५४ हजार ६५ झाली आहे, यापैकी एक लाख
८६ हजार ९३५ रुग्ण बरे झाले असून, सध्या एक लाख ५५ हजार २२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत या संसर्गामुळे ११ हजार ९०३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचं
प्रमाण तीन पूर्णांक सहा दशांश टक्के असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
देशात
सध्या ९२४ प्रयोगशाळांमधून कोविड संसर्गाची तपासणी करण्यात येत आहे, यापैकी ६७४ प्रयोगशाळा
सरकारी तर अडीचशे प्रयोगशाळा खासगी असल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद
आयसीएमआरकडून सांगण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज सकाळी शहाण्णव कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे बाधितांची
संख्या तीन हजार अठ्ठावीस झाली आहे. यापैकी एक हजार सहाशे अठ्ठावन्न रुग्णांना बरे
झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत एकशे त्रेसष्ट बाधितांचा
मृत्यू झाला असून एक हजार दोनशे सात रुग्णांवर उपचार सुरू आहे.
आज समर्थ
नगर भागात दहा तर एन आठ सिडको आणि न्यू विशाल नगर भागात प्रत्येकी पाच रुग्ण सापडले.
नारेगाव, विश्रांती नगर, एन नऊ सिडको, आणि शिवाजी नगर भागात प्रत्येकी तीन जणांना कोरोना
विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं.
समता
नगर, पळशी, एसआरपीएफ कॉलनी, जयभवानी नगर, जुन्या मुकुंदवाडीतला विठ्ठल मंदिर परिसर,
नागेश्वरवाडी, रमा नगर, सिडको वाळूज महानगर दोन, बजाज नगर, गुलमोहर कॉलनी, गारखेडा
या भागात प्रत्येकी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले.
राजीव
नगर, पेंशनपुरा, भवानी नगर, रेहमानिया कॉलनी, मसून नगर, पुष्प गार्डन, गजानन नगर, जिल्हा
सामान्य रुग्णालय परिसर, सेव्हन हिल, हडको, जटवाडा रोड, बीडबायपास, ठाकरे नगर, न्यू
एसटी कॉलनी, एन2 सिडको, मनजीत नगर, शंभू नगर, गारखेडा, ब्रिजवाडी, शहानूरवाडी, यशोधरा
कॉलनी, गुलमंडी, पद्मपुरा, उस्मानपुरा, शिवशंकर कॉलनी, बेरी बाग, राजनगर, उत्तम नगर,
जवाहर कॉलनी, ज्योती नगर, सिडको हनुमान नगर, सातारा परिसर, न्यू हनुमान नगर मयूर नगर,
राहुल नगर, बजाज नगर, संभाजी कॉलनी, संजय नगर, अयोध्या नगर, सिडको, मोतीवाला नगर, औरंगपुरा,
विश्वभारती कॉलनी इथं प्रत्येकी एक तर रांजणगाव, शेणपूजी, चिकलठाणा या भागातही एक एक
कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला आहे.
****
अहमदनगर
जिल्ह्यात आज सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी
देण्यात आली. यात संगमनेरच्या तीन, सुपा इथल्या एक आणि अहमदनगर मधल्या दोन रुग्णाचा
समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोनशे एकोणीस झाली आहे.
****
सोलापूर
जिल्ह्यात आज अठरा कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातली बाधितांची संख्या
एक हजार आठशे अकरा इतकी झाली आहे.
****
वंदे
भारत अभियानांतर्गत मुंबईत आतापर्यंत ८२ विमानातून तब्बल १३ हजार ४५६ प्रवासी दाखल
झाले आहेत. येत्या १ जुलैपर्यंत आणखी ७६ विमानांनी प्रवासी मुंबईत येणार आहेत. आतापर्यंत
दाखल झालेल्या प्रवाशांमध्ये ४ हजार नऊशे एकोणनव्वद प्रवासी मुंबईतले, ४ हजार तीनशे
चौसष्ट प्रवासी उर्वरित महाराष्ट्रातले तर ४ हजार एकशे तीन प्रवासी इतर राज्यातले आहेत.
मुंबईतील
प्रवाशांची संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा विविध हॉटेलमध्ये करण्यात येत असून, इतर
जिल्ह्यातल्या तसंच इतर राज्यातल्या प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवून
संबंधित जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांचं विलगीकरण केलं जात आहे.
****
राजमाता
जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी जिजाऊंना अभिवादन केलं. राजमाता जिजाऊ या नेतृत्व, कर्तृत्व आणि मातृत्वाच्या
मूर्ती होत्या, त्यांच्या नजरेतील स्वराज्य आणि सुराज्य आणण्यासाठी प्रयत्नशील राहू,
असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
ऊसासाठी
ठिबक सिंचन तसंच आंतर पिकांचा अवलंब आवश्यक असल्याचं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे
कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांनी म्हटलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कास्ट
प्रकल्प आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृश्य संवाद
प्रणाली द्वारे घेण्यात आलेल्या तीन दिवसीय शेतकरी प्रशिक्षण वर्गाचा आज समारोन झाला,
या समारोप सत्रात कुलगुरू बोलत होते.
****
No comments:
Post a Comment