Wednesday, 18 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.09.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१८  सप्टेंबर  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्यामुळे शिवसेनेचा विरोध होता, पर्यावरणाचं नुकसान होणार नसेल, आणि नागरिकांची संमती असेल अशा जागी हा प्रकल्प उभारण्यास काही हरकत नाही, असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. नाणार प्रकल्पाबाबत पुनर्विचार करणार असल्याचं काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बोलत होते. शिवसेनेचा विकासाला विरोध कधीही नव्हता असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे.
****

 दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं औरंगाबाद इथं प्रस्तावित स्मारक उभारण्याची जबाबदारी राज्य शासनानं सिडकोकडे सोपवली आहे. या स्मारकासाठी पन्नास कोटी ६१ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. काल याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला.
****

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते प्रशासकीय तसंच पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन, निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत. येत्या नऊ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होत असून, त्यापूर्वी नवीन विधानसभा स्थापन होणं आवश्यक आहे. आयोगाच्या या दौऱ्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
****

 भारत आणि दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज मोहाली इथं होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. या सामन्याच्या तिकिटांचा परतावा उद्यापासून दिला जाणार आहे. या सामन्यात नाणेफेक देखील झाली नसल्यानं प्रेक्षकांना तिकिटांचे पैसे परत दिले जाणार असल्याचं हिमाचल क्रिकेट संघटनेनं सांगितलं.
****

 चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज महिला एकेरीच्या सामन्यात भारताच्या पी.व्ही.सिंधूचा सामना चीनच्या ली ज्युराई बरोबर होणार आहे, तर सायना नेहवालचा सामना थायलंडच्या बुसानन ओंगबाम बरोबर होणार आहे.
*****
***

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 31 مئی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 31 May 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ت...