आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१६ डिसेंबर २०१९ सकाळी ११.००
वाजता
****
पाकिस्तानविरोधात
१९७१च्या युद्धात मिळवलेल्या विजयाचा स्मृतीदिन अर्थात विजय दिवस आज देशभरात उत्साहानं
साजरा होत आहे. या युद्धात हुतात्मा झालेल्यांना देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैनिकांच्या साहस आणि बलिदानाला वंदन केलं असून
या दिवशी आपल्या भारतीय सेनेनं रचलेल्या इतिहासाची नेहमीच सुवर्णांक्षरांनी नोंद राहील
असं ट्वीटरवर म्हटलं आहे.
****
राज्य
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर इथं प्रारंभ होत आहे. आठवडाभर चालणाऱ्या
या अधिवेशनात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना
आर्थिक मदत, तसंच विविध प्रकल्पांना राज्य सरकारनं दिलेल्या स्थगितीसंदर्भातले मुद्दे
मांडले जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात तारांकित प्रश्नोत्तराचा तास होणार नाही,
असं सरकारनं यापूर्वीच घोषित केलं आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर
काल माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करण्याच्या
दिशेनं वाटचाल सुरु असल्याचं सांगितलं. अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा
प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले. सरकारनं आरे इथलं मेट्रो कार शेडचं काम वगळता कोणत्याही विकास कामाला स्थगिती दिली
नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
या महिनाअखेरपर्यंत आधार आणि पॅन नंबर संलग्न करणं अनिवार्य
असल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे. यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय आयकर सेवांचा लाभ
मिळणार असल्याचंही विभागाकडून सांगण्यात आलं आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ - सीबीडीटीनं
आधार आणि पॅन नंबर जोडण्याची मुदत ३१ सप्टेंबरवरुन ३१ डिसेंबर केली आहे.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण येत्या १ फेब्रुवारीला
अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्ली इथं, उद्योजक
संस्था, शेतकरी संघटना तसंच, अर्थतज्ज्ञांसह अर्थव्यवस्थेतल्या इतर भागधारकांसोबत त्या
चर्चा करणार आहेत. यानंतर त्या वित्तीय आणि भांडवली क्षेत्राच्या प्रतिनिधींचीही भेट
घेणार आहेत.
****
No comments:
Post a Comment