Thursday, 15 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.08.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 August 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ ऑगस्ट २०१९ दुपारी .०० वा.
****

 राज्यातून समुद्रात वाहून जाणारं १६७ दशलक्ष घनफूट `टीएमसी` पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयातील मुख्य ध्वजवंदन केल्यानंतर राज्यातील जनतेला संबोधित करताना बोलत होते. विविध योजनांद्वारे राज्य सरकार वंचितांच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्य पुराच्या गंभीर समस्येचा सामना करत आहे, पुरग्रस्त लोकांचं लवकरात लवकर पुर्नवर्सन केलं जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पूरग्रस्तांसाठी बचाव कार्य करणाऱ्या यंत्रणा आणि लोकांचं कौतुक त्यांनी यावेळी केलं.
****

 राज्य सध्या निसर्गाचा कोप अनुभवत असताना शासन खंबीरपणे जनतेच्या पाठीशी उभं असल्याचं औरंगाबादचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे.  त्यांच्या हस्ते आज स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्तालयात मुख्य ध्वजारोहण झालं. त्यावेळी ते बोलत होते.

कोल्हापूर, सांगली तसंच कोकण येथील पूरस्थितीची पार्श्र्वभूमी तसंच मराठवाड्यासारख्या कमी पाऊस झालेल्या भागामध्ये सरकारतर्फे तातडीनं आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, शी ग्वाही रावते यांनी यावेळी दिली.  
****

 जालना जिल्ह्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांची यावेळी उपस्थित होते.
 बीड इथं जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण केलं. यावेळी त्यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल शाळकरी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं.
 नांदेड इथं जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते पोलिस परेड मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. लातूर इथल्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर शासकीय ध्वजवंदन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते झालं. हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्तचे ध्वजारोहण पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झालं. उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पोलिस दलानं पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यलय परिसरात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं. या वेळी विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्यांचा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते प्रशतीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
****
 औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

 मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या प्रांगणात वरिष्ठ न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
****

 स्वातंत्र्यदिनानिमित्त आजपासून खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दिव्यांगांना पाहता येतील असे कार्यक्रम व्हावेत यादृष्टीनं, दिव्यांग हक्क कायद्याची अंमलबजावणी प्रभावी करण्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ठरवलं आहे. त्याची सुरवात म्हणून आजच्या स्वातंत्र्यदिनापासून खाजगी वृत्तवाहिन्यांनी कर्णबधीरांसाठीच्या भाषेचा वापर करून छोटा कार्यक्रम सादर करावा असे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत.
****

 हिंगोली इथं काल झालेल्या जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर झालेला निधी खर्च करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रस्तवित कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व संबंधित विभागांनी दर आठवड्याला कामांचा आणि खर्चित-अखर्चित निधीचा अहवाल सादर करण्याचंही त्यांनी सूचित केलं.
****

 बहीण-भावाच्या प्रेमाचं प्रतिक असलेला रक्षाबंधनाचा सण आज देशभरात उत्साहानं साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सणानिमित्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. या सणाच्या निमित्तानं महिला आणि मुलींना सुरक्षित वातावरण देण्याचा निर्धार करुया, असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरुन देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
*****
***

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 01 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 June 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...