Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 10 September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
बाटलीबंद पाणी विकणाऱ्या कंपन्यांनी आगमी तीन दिवसात पॅकेजींग विषयी नवे
पर्याय शोधावेत असं केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी
म्हटलं आहे. एकदा वापरलेल्या प्लॅस्टीकला पर्याय
शोधण्यासाठी बाटली बंद पाणी विकणाऱ्या
कंपन्या आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यासंदर्भात
निर्णय घेण्यासाठी कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली आंतर मंत्रालयीन समिती स्थापन
केली आहे, असं त्यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं.
****
शीखविरोधी दंगलीच्या
ज्या प्रकरणांमध्ये आरोपी निर्दोष सुटले किंवा त्यांचे खटले बंद झाले आहेत, अशा सात
प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय विशेष
तपास पथकानं घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं हे विशेष तपास पथक स्थापन केलं आहे.
****
वीज ग्राहकांच्या
हितासाठी केंद्र सरकार लवकरच नवीन वीज दर धोरण आणणार आहे. केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री
आर. के. सिंग यांनी काल आकाशवाणीला ही माहिती दिली. ग्राहकांच्या आधिकारांचं रक्षण
करण्याकरता पहिल्यांदाच असा ठोस निर्णय घेतला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. ग्राहकाला
चोवीस तास वीज मिळणं हा त्याचा अधिकार असून काही कारणानं भार नियमन झालं तर वीज कंपन्यांना
दंड आकारला जाणार आहे. दंडाची ही रक्कम थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होईल, असंही ते
म्हणाले. वीजवितरणात कुठेही बाधा आली, तर ठरविक काळात त्याची पूर्तता करणं हे वीजकंपन्यांना
बंधनकारक राहणार आहे.
****
मोहर्रमचा सण आज देशभरात उत्साहानं साजरा केला जात
आहे. सत्य आणि न्यायाचं संरक्षण करण्याची शिकवण हा सण देतो. ठिकठिकाणी आज या सणानिमित्त
मिरवणुकांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षादलांच्या
एका कारवाईत पाच नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. बंदगुडा गावच्या जंगलात केंद्रीय
राखीव पोलिस दलाच्या जवानांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीनं एक कारवाईत ही अटक केल्याची
माहिती काल पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेले नक्षलवादी विविध हिंसाचाराच्या आणि लुटींच्या
प्रकरणातील आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
भारतीय मुष्टीयोद्धे आज रशियातील एकातेरिनबर्गमध्ये
सुरू विश्र्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत आपल्या प्रारंभीच्या लढती खेळतील. बृजेश यादवची
८१ किलो वजनगटात पहिली लढत पोलंडच्या मालेज गोइनस्कीविरुद्ध होईल. अमित पंघाल, आशीष
कुमार, संजीत, कविंदर सिंह बिष्ट आणि दुर्योधन सिंह नेगी हे अऩ्य मुष्टीयोद्धेही आज
आपल्या प्रारंभीच्या लढती खेळतील. सत्त्याऐँशी देशांचे साड़े चारशेहून अधिक मुष्टीयोद्धे
या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
****
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जागतिक बँकेचं
१७ सदस्यांचं एक पथक आज कोल्हापुमध्ये दाखल
झालं आहे. या पथकानं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून पूर परिस्थितीचा सविस्तर
आढावा घेतला. दिवसभर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांना भेटी दौऱ्यानंतर सायंकाळी सात
वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनासमवेत पथकाचे सदस्य सविस्तर चर्चा करणार असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातल्या महसूल मंडळाचं विभाजन करून सांगली अप्पर तहसीलसाठी
कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आलं आहे. पाच महसूल मंडळं आणि एकतीस गावं
या कार्यालयाला जोडण्यात आली आहेत. या नवीन अप्पर तहसीलकडं सांगलीसह माधवनगर, पवाड,
हरिपूर, कवठेपिरान इनामधामणी, सांगलीवाडी, दुधगाव,
समडोळी, नांद्रे आदी एकतीस महत्वाच्या
गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. मिरज
तहसीलकडे सहा महसूल मंडळं आणि पन्नास गावांतली महसुली कामं सोपण्यात आली आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment