आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१२ ऑगस्ट २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या शनिवारपासून
सुरु होणाऱ्या स्वच्छता ही सेवा अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी ही एक ऐतिहासिक लोकचळवळ
असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. येत्या दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या
दिडशेव्या जयंती समारंभाचा शुभारंभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी या
अभियानात सहभागी होऊन स्वच्छ भारत मिशनला यशस्वी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या
कार्यकाळात २००६ ते २००८ दरम्यान बँकांची बुडित कर्ज वाढली असल्याच्या, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन
यांच्या अहवालाचा आधार घेत, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर टीका केली.
त्या नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होत्या. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी कालच्या दिल्ली
उच्च न्यायालयाच्या निकालानुसार याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्यावरच्या
आरोपांचं उत्तर द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
****
आशियाई
स्पर्धेतल्या सुवर्ण पदक विजेता मुष्टियोद्धा अमित पंघाल याची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी
शिफारस करण्यात आली आहे. भारतीय मुष्टीयुद्ध
महासंघानं सोनिया लाठेर आणि गौरव बिधुरी यांच्या सोबत अमितच्या नावाची शिफारस देशातल्या
दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्कारासाठी केली आहे. सुप्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त दरवर्षी २९ ऑगस्टला
होणरा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समारंभ या वर्षी येत्या २५ सप्टेंबरला होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं हैद्राबाद इथून आलेला
५१ लाख रूपयांचा गुटखा पोलिसांनी पकडला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेत भारतीय जनता पक्षाच्या
गुरप्रितकौर सोडी यांची विरोधी पक्ष नेता पदी नियुक्ती झाली आहे. नांदेड महापालिकेच्या
त्या पहिल्याच महिला विरोधी पक्षनेत्या ठरल्या आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment