Sunday, 16 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.09.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१६  ऑगस्ट  २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 देशभरात पर्यटनाचा उत्सव `पर्यटन पर्व` आजपासून सुरू होत आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह आज नवी दिल्लीत या कार्यक्रमाचा प्रारंभ करतील.  देशाच्या सांस्कृतिक विविधतेकडे लक्ष वेधणं तसंच पर्यटनाचे लाभ लक्षात आणून देण्यासाठी हे पर्यटन पर्व आयोजित करण्यात आल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे. 

 भारतीय पर्यटन विभागाच्या वतीनं आज औरंगाबाद  इथं रंगीन दरवाजा आणि किले अर्क परिसरात हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शहरातले प्रसिद्ध ५२ दरवाजे आणि किलेअर्क विषयी पर्यटनप्रेमींना माहिती देण्यात आली. उद्या सकाळी आठ वाजता बीबी का मकबरा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. पर्यटन पर्व हा १२ दिवसांचा उपक्रम असून या दरम्यान अनेकविध उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****



 ज्येष्ठागौरी पूजनाचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. काल सायंकाळी घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन झालं. आज त्यांची मनोभावे पूजा करून, त्यांना पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो. या तीन दिवसीय उत्सवाची उद्या सांगता होईल. मराठवाड्यात महालक्ष्मी पूजन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उत्सवात आजच्या महापूजेसाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी सध्या बाजारपेठांमधून गर्दी दिसून येत आहे.

****



 जालना शहर आणि औद्योगिक वसाहतीत काल रात्री उशीरा धाडी घालून पोलिसांनी सुमारे ५० लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि तीन मालवाहू गाड्या जप्त केल्या. या प्रकरणी चार व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. जालना पोलिसांच्या चार स्वतंत्र पोलिसांनी चार व्यापारी आस्थापनांवर छापे टाकून ही कारवाई केली.

****



 नांदेड जिल्ह्याच्या मुखेड नगरपालिकेत कालपासून स्वच्छ भारत पंधरवड्याला सुरूवात झाली. या निमित्तानं विविध उपक्रम राबवले जाणार असून, याचाच एक भाग म्हणून काल शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत जनजागृती संदेश फेरी काढली. नगराध्यक्ष बाबूराव देबडवार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, यांच्या मार्गदर्शनात काढलेल्या या फेरीत, नागरिकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यात आलं.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 17 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...