****
नवी दिल्लीत जंतर-मंतरचे बंद दरवाजे
ओलांडून परिसरात
प्रवेश केल्याप्रकरणी कॉकरोच जनता पार्टीचे नेते
सौरभ दास
आणि आशुतोष
रंका यांना
पाच दिवसांची
न्यायालयीन कोठडी
सुनावण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सौरभ दास,
आशुतोष रंका
आणि इतरांविरुद्ध
एफआयआर दाखल
केला आहे. बॅरिकेडिंग तोडून
त्यांनी काल
जंतर-मंतरमध्ये
प्रवेश केला
होता आणि
मुख्य निवडणूक
आयुक्त ज्ञानेश
कुमार यांच्या
राजीनाम्याची मागणी
करत घोषणाबाजी
केली. दोन
दिवसांपूर्वीच दिल्ली
पोलिसांनी आंदोलनं आणि निदर्शनांसाठी
निश्चित केलेल्या
ठिकाणांच्या यादीतून
जंतर-मंतरला
वगळलं आहे.
****
बिहारमध्ये
वैशाली जिल्ह्यातल्या
राघोपूर दियारा
भागात गंगा
नदीत बोट
उलटून झालेल्या
दुर्घटनेत १३ जणांचा
मृत्यू झाला.
या दुर्घटनेतून
सहा जणांची
सुटका करण्यात
आली असून,
इतर सात
जणांना उपचारांसाठी
रुग्णालयात दाखल
करण्यात आलं
आहे. बोटीत
अंदाजे १५ ते
२० जण
प्रवास करत
होते. पंतप्रधान
नरेंद्र मोदी
यांनी या
दुर्घटनेबद्दल दुःख
व्यक्त केलं असून, पंतप्रधान
राष्ट्रीय मदत
निधीतून मृतांच्या
नातेवाईकांना प्रत्येकी
दोन लाख
रुपये, तर
जखमींना प्रत्येकी
५० हजार
रुपयांची मदत
जाहीर केली
आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी
आज नवी
दिल्लीत आयोजित
‘बृहत्तर भारत
: जागतिक स्तरावर
भारताचे सांस्कृतिक
संबंध’ या
विषयावरच्या आंतरराष्ट्रीय
परिषदेला व्हिडिओ
संदेशाद्वारे संबोधित
करणार आहेत. तीन दिवस
चालणाऱ्या या
परिषदेत ५० देशांतले
प्रतिनिधी, राजदूत
आणि अभ्यासक
सहभागी होणार
असून, भारताचे
जगातल्या विविध
देशांशी असलेले
ऐतिहासिक आणि
समकालीन सांस्कृतिक
संबंध, सामायिक
सांस्कृतिक वारसा
आणि सभ्यतांमधली
देवाणघेवाण यांवर
चर्चा होणार
आहे.
****
लडाख
हा केंद्रशासित
प्रदेश भारताचा
अविभाज्य आणि
अखंड भाग
असून, चीननं
कितीही नकार
दिला तरी
ही स्थापित
वस्तुस्थिती बदलू
शकत नाही
असं परराष्ट्र
मंत्रालयाचे प्रवक्ते
रणधीर जैस्वाल
यांनी सांगितलं.
लडाखबाबत चीननं
केलेल्या टिप्पणीवर
ते प्रसारमाध्यमांशी
बोलत होते. लडाख केंद्रशासित
प्रदेशातली २८ ठिकाणं
'सर्व्हे ऑफ
इंडिया'च्या
अधिकृत नकाशावर
प्रमाणित नावांसह
निश्चित करण्यात
आली आहेत
आणि ही
प्रक्रिया लडाख
केंद्रशासित प्रदेश
प्रशासन आणि
स्थानिक भागधारकांशी
सल्लामसलत करून
पूर्ण करण्यात
आली आहे,
असं त्यांनी
सांगितलं.
****
यंदाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग राज्यभरात चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार आहे. या अभियानात चारा जतन, पीक अवशेषांचा योग्य वापर, चाऱ्यावर प्रक्रिया, मुरघास निर्मिती आणि पर्यायी चारा उत्पादन याबाबत पशुपालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केलं जाईल. पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यातले शेतकरी आणि पशुपालकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून उपलब्ध चारा सुरक्षित ठेवावा, पीक अवशेषांची नासाडी टाळावी आणि त्यावर योग्य प्रक्रिया करून सकस चारा निर्मितीला प्राधान्य द्यावं, असं आवाहन पशुसंवर्धन विभागानं केलं आहे.
****
सांगली
जिल्ह्यातल्या खानापूर इथं वन विभागानं दुष्काळी परिस्थितीवर
मात करण्यासाठी पुढाकार घेतला असून,
श्रमदानातून २८ वनराई बंधारे
बांधले आहेत. वनक्षेत्रामधल्या नैसर्गिक पाणीस्त्रोतांवर
सुमारे २२५ वनराई बंधारे बांधण्यात येणार
असल्याची माहिती वनक्षेत्रपाल विलास पवळे यांनी
दिली.
****
लातूर
जिल्ह्यातल्या सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी क्षयरोग रुग्णांच्या अनिवार्य
नोंदणी प्रक्रियेचं तंतोतंत पालन करावं, असं
आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केलं आहे. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. क्षयरोग रुग्णांची नोंदणी न करणं,
अपूर्ण माहिती देणं किंवा अनिवार्य प्रक्रियेचं पालन न करणं,
यासाठी कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते,
असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं.
****
बीड इथं काल जिल्हा विकास सहाय्यक युनिटच्या कामकाजाचा आणि वार्षिक कृती आराखडा २०२६-२७ चा आढावा घेण्यात आला. बैठकीत कृषी, पर्यटन, दुष्काळ व्यवस्थापन, सिंचन आणि खासगी गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा झाली. सौताडा, कुरणवाडी आणि नायगाव इथल्या पर्यटन विकास, ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ उपक्रम, तसंच प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेच्या समन्वयावर भर देण्यात आला.
****
सार्वजनिक
ठिकाणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांमध्ये नागरी कर्तव्यांची जाणीव
असण्याची गरज छत्रपती संभाजीनगरचे महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी व्यक्त
केली आहे. शहरातल्या नवखंडा महाविद्यालयात स्वच्छता जनजागृती कार्यक्रमात प्रमुख
पाहुणे म्हणून ते बोलत होते. स्वच्छतेबाबत जनजागृतीसोबतच विद्यार्थ्यांमध्ये नागरी
कर्तव्यांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला
****
माजी
राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल
कलाम यांचा जन्मदिवस, १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन
म्हणून साजरा करण्यात येतो. या औचित्याने छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठातल्या ज्ञानस्त्रोत केंद्रामध्ये आज दुर्मिळ ग्रंथांचं प्रदर्शन
भरवण्यात आलं आहे. यामध्ये ऐतिहासिक
विषयांवरच्या दुर्मिळ ग्रंथांचा समावेश
आहे.
****
No comments:
Post a Comment