Friday, 19 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 19 June 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ जून २०२ सकाळी.०० वाजता

****

पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेंतर्गत दोन हजार ४०० कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात २०० ठिकाणी, प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं, अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत ६३ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून, त्यापैकी जवळपास ३० टक्के महिला असल्याचं, कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

****

भारत जगासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल फ्रान्समध्ये पॅरिस इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते. भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे, देशात गेल्या बारा वर्षात अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, फ्रान्स आणि स्लोव्हाकिया या दोन देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परत आले आहेत.

****

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात दहा हजार टनाच्या ॲल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी होणार आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्त्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं ऍल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यात गेवराई इथं अखिल भारतीय रामराज्य निर्माण सेनेचे अध्यक्ष भिमाशंकर यादव पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. नगरसेविका डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या मध्यस्थीने प्रशासनाने मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. ब्रम्हगाव इथंल्या मंदीरातील मारोतीच्या मुर्तीची विटंबना आणि गोहत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, तसेच दुग्धाभिषेक करणाऱ्या तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण सुरू होते.

****

कोल्हापूर इथंल्या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामाचा शुभारंभ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या कार्यक्रमानंतर अमित शाह यांची कोल्हापूर इथं जाहीर सभा होणार आहे.

****

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ६२ व्या सत्रात, भारतानं पाकिस्तानवर जोरदार टीका केली असून, सिंधू पाणी करार कालबाह्य आणि सद्यस्थितीशी विसंगत असल्याचं म्हटले आहे. या परिषदेत भारताच्या स्थायी समितीच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी भारतावरील पाकिस्तानचे आरोप फेटाळून लावले आहे. दहशतवादाला सतत प्रोत्साहन देणाऱ्या देशाकडून सदिच्छा आणि मैत्रीवर आधारित सहकार्यातून लाभाची अपेक्षा करू शकत नाही, असं सिंह यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर द्विपक्षीय मुद्दे वारंवार उपस्थित करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांवरही त्यांनी यावेळी टीका केली.

****

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न तयार करणं, त्यावरील, पॅकिंग आणि साठवणूक या सर्वांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा तसंच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागांचा दर्जा फूड-ग्रेड आणि गंजरोधक असणं आवश्यक असल्याचं प्राधिकरणाने म्हटलं आहे. अशा उपकरणांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभाल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

****

फिफा विश्वचषक स्पर्धेत, मेक्सिकोने आज ग्वादालहारा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला १-० ने पराभूत करून बाद फेरीच्या ३२ संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवला. मेक्सकोने ५० व्या मिनिटाला निर्णायक गोल केला.

याआधी काल रात्री झालेल्या '' गटातील सामन्यात कॅनडाने कतारचा ६-० ने पराभव केला. तर, '' गटात चेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १-१ असा सामना बरोबरीत सुटला.

****

भारतीय ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज प्रतिष्ठित दोहा डायमंड लीग स्पर्धेत सहभागी होणार आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 19 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...