Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 31 August
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· विकसित भारतासाठी ‘अंमली पदार्थमुक्त युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त भारत’ साध्य करण्याचं
उद्दीष्ट, पंतप्रधानांचं मन की बात मधून प्रतिपादन
· पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या २६व्या शिखर परिषदेसाठी किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक
इथं दाखल
· नेपाळमध्ये अजुनही २७५ भारतीय नागरिक बेपत्ता, नागपूरचे १०२ यात्रेकरू परतले
· मराठा समाजाला सरसकट कुणबी घोषित करावं-आंदोलकांची मागणी; कायदेशीर
मागण्यांबाबत राज्य सरकार चर्चेला तयार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
आणि
· महिला आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा थायलंडवर विजय
****
विकसित भारतासाठी ‘अंमली पदार्थमुक्त युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त
भारत’ साध्य
करण्याचं उद्दीष्ट असून, यात मोठ्या संख्येनं देशाची युवा पिढी सहभागी होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते देशवासियांशी संवाद साधत होते. या मालिकेचा १३७ वा भाग काल प्रसारित झाला. अंमली पदार्थांच्या व्यसनाचे परिणाम संपूर्ण कुटुंब
आणि समाजालाही भोगावे लागतात असं सांगत पंतप्रधानांनी, अंमली पदार्थांविरुद्ध जनजागृती करणाऱ्या आणि
व्यसनाशी झुंजणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांची त्यांनी
प्रशंसा केली. अंमली पदार्थ-मुक्त भारतासाठी प्रभावी घोषवाक्य बनवावं, याबाबत NashaMuktYuva हा हॅशटॅग वापरुन, समाज माध्यमावरुन याचा प्रसार करण्याचं आवाहन त्यांनी
केलं.
भारताच्या स्वातंत्र्य
दिनानिमित्त ‘हर घर
तिरंगा’ ही
मोहीम देशाच्या अभिमानाच्या भावनेला अजून बळकट करते असं सांगून यातून आठ कोटींहून
जास्त तिरंगा सेल्फी आपल्याला प्राप्त झाल्याचं ते म्हणाले.
भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण
मिशन शक्ती सॅट उपक्रमाची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. या माध्यमातून विद्यार्थिनींना उपग्रह तंत्रज्ञान आणि नवोन्मेष शिकण्याची संधी मिळत असल्याचं ते म्हणाले.
बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी
आपले सण आणि उत्सव, आपल्या परंपरांसोबतच, आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात असं
सांगून या सणासुदीच्या काळात, आपण पुन्हा एकदा स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारताचा आत्मनिर्भर बनण्याचा मार्ग हा भारतीय
वस्तूंच्या गर्वानं स्वीकार करण्यानंच विस्तारत जाईल, असंही ते म्हणाले.
पीएम स्वनिधी योजना, महिला सक्षमीकरण, स्वच्छता अभियान, नागालँडमधली फुलशेती, ओदिशातलं निसर्ग पर्यटन आणि जंगल संवर्धन, तसंच विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात मुलींचा सहभाग यांचाही पंतप्रधानांनी ‘मन की बात’ मध्ये विशेष उल्लेख केला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्ताचा दौरा आटोपून
किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक इथं पोहोचले. आज आणि उद्या बिश्केक इथं
आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या २६व्या शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या उझबेकिस्तान दौऱ्यात भारत आणि उझबेकिस्तानदरम्यान ११ महत्त्वपूर्ण करारांवर काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भूविज्ञान आणि खनिज संसाधन, आयुर्वेद आणि पारंपरिक चिकित्सा प्रणाली यांसह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांनी भर दिला. पंतप्रधानांना उझबेकिस्तानच्या ‘दोस्तालिक ऑर्डर ऑफ हायएस्ट डिग्री’ या सर्वोच्च सन्मानाने काल गौरवण्यात आलं. ताश्कंदमध्ये उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव्ह यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान १४० कोटी देशवासियांचा सन्मान असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.
****
नेपाळमध्यल्या अचानक
आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ७६८ वर पोहोचली असून, जवळपास अडीच हजार लोक अद्याप बेपत्ता आहेत.
पूरग्रस्त भागातून आतापर्यंत १०८ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असून, ५० नागरिकांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाल्याचं
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. २७५ भारतीय नागरिक
अद्याप बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे १०२ यात्रेकरू काल
सुरक्षित राज्यात परतले.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांसह
लाडक्या बहिणी आणि युवकांच्या पाठीशी केंद्र आणि राज्यातलं डबल इंजिन सरकार
खंबीरपणे उभं राहील आणि विकास कामांकरता निधी कमी पडू देणार नाही, अशी
ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते काल परभणी इथं शेतकरी आणि
युवा संवाद मेळाव्यात बोलत होते. सरकारच्या तिजोरीवर सर्वसामान्य शेतकर्यांचा पहिला
हक्क आहे, असं नमूद करत शिंदे यांनी, महायुती सरकारने आपल्या कारकिर्दीत सातत्याने शेतकरी
हिताचेच निर्णय घेतल्याचं सांगितलं. परभणीच्या विकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची
ग्वाही त्यांनी दिली, तसंच परभणीत नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यात येईल, असंही यावेळी जाहीर केलं.
****
राज्य सरकारने मराठा
समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करावं, अशी मागणी मराठा आरक्षण
आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केली. ते काल आंतरवाली सराटी
इथं उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी वार्ताहरांशी बोलत होते. ही मागणी पूर्ण झाली नाही, तर
मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी
दिला. मराठा समुदायाच्या मुख्य समितीची बैठक १२ सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटी इथं
होणार असून, मुंबईत उपोषण करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेतला जाईल, तोपर्यंत
सरकारनं आपल्या मागण्या मान्य कराव्यात, असं त्यांनी सांगितलं.
जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे सदस्य मोठ्या प्रमाणात आंतरवाली सराटी
इथं जमले आहेत.
****
दरम्यान, मराठा
समाजाच्या प्रश्नांवर याआधीही मार्ग काढला होता, यातूनही मार्ग काढू, सरकारचे
प्रतिनिधी जरांगे यांच्याशी चर्चा करतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी काल नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले,
बाईट- मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
****
आज तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त विविध शिव मंदिरांमध्ये भाविकांनी मध्यरात्रीपासून गर्दी केली आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथल्या
ज्योर्तिंलींगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक दाखल होत आहे. काल रात्रीपासून
ब्रह्मगिरीला महाप्रदक्षिणा म्हणजेच फेरीला प्रारंभ झाला. तिसऱ्या श्रावणी सोमवारी या ज्योर्तिलिंगाचं विशेष
महत्व असल्याने यंदा तीन लाखाहून अधिक भाविक दाखल होतील असा अंदाज आहे. राज्य
परिवहन महामंडळाच्या २८० अतिरीक्त बसगाड्या त्र्यंबकेश्वरसाठी सोडण्यात आल्या
आहेत.
****
अहिल्यानगर ते बीड डेमू
रेल्वेच्या वेगात वाढ करण्यात आली असून, एक सप्टेंबरपासून मध्य रेल्वेचं सुधारित वेळापत्रक
लागू होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ एक तास ३५ मिनिटांनी कमी होणार आहे. ही
रेल्वे अहिल्यानगरहून सकाळी पावणे आठ
वाजता सुटून पावणे बारा वाजता बीडला पोहोचेल. परतीची रेल्वे बीडहून दुपारी
१२ वाजता सुटून चार वाजता अहिल्यानगरला पोहोचेल. प्रवाशांनी नव्या वेळापत्रकाची
नोंद घेऊन प्रवासाचं नियोजन करावं, असं आवाहन खासदार बजरंग सोनवणे यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इंटॅक या संस्थेच्या वतीने काल शहरातल्या गोमुख इथून हेरिटेज वॉक घेण्यात आला. मलिक अंबरने तत्कालिन खडकी शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना देत नहर-ए-अंबरीच्या माध्यमातून प्रभावी जलपुरवठा व्यवस्था
निर्माण केली होती. सुमारे चार शतकांपूर्वी विकसित झालेल्या या जलव्यवस्थेचं
ऐतिहासिक महत्त्व आणि तिच्यामागील अभियांत्रिकी कौशल्य याविषयी इतिहास अभ्यासक
संकेत कुलकर्णी आणि आदित्य वाघमारे यांनी यावेळी माहिती दिली. महापौर समीर राजुरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकिरये, मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कमर्चारी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं
अतिरिक्त शेंद्रा औद्योगिक क्षेत्राच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जमिनीच्या
भूसंपादनाला वेग आला आहे. सटाणा इथल्या १३८ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाचा दर अखेर
निश्चित झाला असून,
शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ९३ लाख १४ हजार रुपयांचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा
झाला आहे. राज्याच्या उच्चाधिकार समितीने या दराला अंतिम मंजुरी दिली असून, यावर आता शेतकऱ्यांची मंजुरी घेण्यासह अन्य कारवाईला
वेग येईल.
****
महिलांच्या आशिया चषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल दुबईत झालेल्या पहिल्या साखळी सामन्यात भारताने थायलंडचा ९४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय महिलांनी निर्धारि षटकात नऊ बाद १५९ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला थायलंडचा संघ १६व्या षटकात ६५ धावांवर सर्वबाद झाला.
****
हवामान
मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तर, मराठवाड्यात हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment