Saturday, 28 February 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.02.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 February 2026

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      एचपीव्ही लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेला राजस्थानात अजमेर इथून प्रारंभ

·      गुजरातमध्ये साणंद इथं सेमीकंडक्टर प्रकल्पाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

·      राज्यात एकात्मिक कापूस खरेदीला १५मार्चपर्यंत मुदतवाढ

·      होळी आणि धुळवडीचा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचं पंकजा मुंडे यांचं आवाहन

आणि

·      एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक नसल्याचा महामंडळाचा खुलासा

****

एचपीव्ही लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेला आज राजस्थानात अजमेर इथून प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज पाच मुलींना ही लस देण्यात आली, हे लसीकरण महिला सक्षमीकरणातलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. म्हणाले -

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावं, याकरता १४ वर्ष वयाच्या मुलींना ही लस देण्यात येणार आहे. दरवर्षी १ कोटी १५ लाख मुलींना लस देण्याचं उद्दिष्ट आहे. हे लसीकरण ऐच्छिक असून, सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत दिली उपलब्ध आहे.

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधे साणंद इथं मायक्रोन टेक्नॉलॉजीच्या अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या सुसज्जतेबद्दल बोलतांना पंतप्रधान म्हणाले -

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत साडेबावीस हजार कोटींहून जास्त गुंतवणूक असलेला हा पहिला मेड-इन-इंडिया सेमीकंडक्टर मेमरी मॉड्यूल्सचा व्यावसायिक उत्पादन प्रकल्प आहे. इथून अधिकृत निर्यातदेखील सुरू होणार आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल आहे.

****

गिग कामगार आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी केंद्र सरकारनं सामाजिक सुरक्षा संहिता २०२० लागू केली आहे, यामुळे या कामगारांसाठी राज्य सरकारला स्वतंत्र महामंडळ स्थापन करता येणार नाही, असं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केलं. ते आज विधानसभेत बोलत होते.

****

शासनानं राज्यात एकात्मिक कापूस खरेदीची मुदत १५ मार्चपर्यंत वाढवली आहे. राज्य सरकारनं निवेदनाद्वारे आज विधानसभेत ही माहिती दिली. यात प्रतिएकर उत्पादकतेच्या आधारे खरेदीची मर्यादा ठरवली जाणार आहे. दरम्यान उद्या १ मार्च पासून हरभरा खरेदी ५ हजार ८८५ रुपये प्रति क्विंटल हमीभावानं सुरू करण्यात येणार असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

****

राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला प्रारंभ होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अभियानाबाबत माहिती दिली, ते म्हणाले -

बाईट - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

****

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर देशातील पहिली एआय-आधारित इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम बसवण्याचं काम प्रगतीपथावर असल्याचं राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितलं. त्या आज विधान परिषदेत बोलत होत्या. या प्रणालीमुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम होऊन भविष्यात अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होणार असल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली.

दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशातल्या मोठ्या रुग्णालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं, मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. राज्यातल्या चार हजारांहून जास्त रूग्णालयात ही योजना लागू असल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली.

****

इस्रायलने आज इराणवर हल्ला चढवला असून देशात आणीबाणी पुकारली आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एअर इंडियाने या भागातली आपली सगळी उड्डाणं स्थगित केली आहेत.

****

राष्ट्रीय विज्ञान दिन’ आज देशभरात साजरा होत आहे. नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी वी रामन यांनी, ‘रामन इफेक्ट’ हा महत्त्वपूर्ण शोध लावला, त्यांच्या कार्याचं स्मरण म्हणून आजचा दिवस ‘विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देशातले शास्त्रज्ञ आणि संशोधकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

होलिका दहनाचा सण परवा दोन तारखेला तर तीन मार्चला धुलिवंदनाचा सण साजरा होणार आहे. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी होळी सणानिमित्त नागरिकांना पर्यावरणपूरक रंग वापरण्याचं आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या -

बाईट - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

****

एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक केलेलं नाही, असं एसटी महामंडळानं स्पष्ट केलं आहे. सवलत धारक प्रवाशांना हे कार्ड बंधनकारक असल्याची अफवा समाज माध्यमांवर पसरली आहे. तथापि, जोपर्यंत ८० टक्के सवलत धारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत प्रवाशांना प्रवास भाड्यात सवलत घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य केलं जाणार नाही, असा खुलासा एसटी महामंडळानं केला आहे.

दरम्यान या स्मार्ट कार्ड’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून,या कार्डच्या नोंदणीची संख्या आता एक लाखाच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे.

****

महाशिबिर आणि योजनांच्या महामेळाव्यातून कायद्याची माहिती तसंच शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नीरज धोटे यांनी केलं आहे. ते आज नांदेड जिल्ह्यातील भोकर इथं विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय सेवांच्या महामेळाव्यात बोलत होते. येत्या १४ मार्च रोजी आयोजित लोक अदालतीत प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी पक्षकार आणि विधीज्ञांनी पुढाकार घ्यावा, असंही न्यायमूर्ती धोटे यांनी म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं राज्यस्तरीय ‘डिपेक्स - २०२६ या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन यांच्या संयुक्त विद्यमानं, ५ ते ८ मार्च दरम्यान आयोजित या प्रदर्शनात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. बीड बायपास परिसरातल्या एमआयटी महाविद्यालयात या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात राज्यभरातील महाविद्यालयांचे संघ, उद्योजक, संशोधक, इनक्युबेशन सेंटर आणि धोरणनिर्माते सहभागी होणार आहेत.

****

आंध्रप्रदेशात काकीनाडा इथं एका फटाका कारखान्यात आज स्फोट झाला. या स्फोटात वीस लोक ठार झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

****

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. श्रीलंकेत पल्लेकेले इथं सायंकाळी ७ वाजता हा सामना सुरू होईल. दरम्यान, सुपर आठ फेरीत उद्या कोलकाता इथे भारताचा सामना वेस्ट इंडिज सोबत होणार आहे. या स्पर्धेतले उपान्त्य फेरीतले सामने ४ आणि ५ मार्च रोजी तर अंतिम सामना ८ मार्च रोजी खेळला जाणार आहे.

****

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ११ विद्याशाखेंतर्गत असलेल्या विविध ८८ शिक्षणक्रमांच्या शैक्षणिक सत्र जानेवारी २०२६ करीता ऑनलाईन प्रवेश घेण्यास १६ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.02.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 28 February 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील अजमेर इथून 'ह्युमन पॅपिलोमा व्हायरस' अर्थात एचपीव्ही लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा आरंभ केला. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणं, हे या महत्त्वाकांक्षी मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट आहे. याप्रसंगी पाच मुलींना प्रातिनिधिक स्वरूपात लस देण्यात आली.  लसीकरणानंतर पंतप्रधानांनी मुलींशी संवाद साधला. देशातील १४ वर्षे वयोगटातील मुलींचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी हा महत्वाचा उपक्रम ठरणार आहे.

****

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओनं- ओडीशाच्या चांदीपूर किनाऱ्यावरून ‘अति-अल्प पल्ला’ हवाई संरक्षण यंत्रणा असलेल्या सलग तीन यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. या चाचण्यांमध्ये क्षेपणास्त्रानं शत्रूच्या विमानांसारख्या वेगानं येणाऱ्या लक्ष्यांचा अचूक वेध घेत त्यांचा नाश केला. विविध उंची आणि अंतरावरून येणाऱ्या हवाई धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत प्रभावी ठरली आहे.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं असून, ही यंत्रणा लवकरच भारतीय सशस्त्र दलात सामील केली जाईल.

****

आज देशभर 'राष्ट्रीय विज्ञान दिन' उत्साहात साजरा केला जात आहे. थोर शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी लावलेल्या 'रामन इफेक्ट' या ऐतिहासिक शोधाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. "वैज्ञानिक कुतूहल आणि संशोधनाचा उत्सव देशाला पुढे नेतो," असं नमूद करत त्यांनी युवकांनी सक्षम बनावं आणि जागतिक हितासाठी विज्ञानाचा वापर करावा, असं आवाहन केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही शास्त्रज्ञांना शुभेच्छा देत त्यांच्या प्रयत्नांमुळेच देशाचे भविष्य उज्वल आणि सुरक्षित होत असल्याचं म्हटलं आहे.या दिनानिमित्त नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय मुख्य सोहळा होत आहे. पुण्यातही ‘आयुका’, ‘आयसर’, ‘जीएमआरटी’ आणि ‘पुणे वेधशाळा’ यांसारख्या संस्थांमध्ये शास्त्रज्ञांशी संवाद आणि वैज्ञानिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं  आहे.

****

उद्या १ मार्च पासून राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले आहेत. याबाबत काल विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ऑनलाईन आणि पारदर्शक परवाना प्रक्रियेच्या माध्यमातून कायदेशीर वाहतूक सुलभ करणं, प्रवाशांनीही परवानाधारक सेवांचा वापर करण्याची जबाबदारी स्वीकारणं ही गरज असल्याचं मंत्री सरनाईक यांनी बैठकीत सांगितलं.  

****

भटक्या कुत्र्यांचं नियमन करण्याची जबाबदारी शिक्षकांवर देण्याचे कोणतेही आदेश महानगरपालिकेनं दिलेले नाहीत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नोडल अधिकाऱ्याची नेमणूकही केलेली नाही, असं स्पष्टीकरण नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. आमदार मनीषा कायंदे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. कुत्रा चावल्यानंतर काय करायचं, याचं प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आलं आहे, मात्र हे काम त्यांनी करण्याबाबतचे आदेश काढण्यात आलेले नाहीत,असं मिसाळ यांनी स्पष्ट केलं. याप्रश्नी नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देश देण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. 

****

गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना केंद्र सरकारच्या 'सामाजिक सुरक्षा संहिता २०२०' अंतर्गत संरक्षण दिले जाणार असल्याचं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधानसभेत सांगितलं. केंद्र सरकारचे कायदे राज्यात लागू होणार असल्यानं, गिग कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करता येणार नाही, मात्र असंघटित कामगारांसाठी विविध तरतुदी केल्या जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं. ऑनलाईन खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पोलिस आणि चारित्र्य पडताळणी करणं कंपन्यांना बंधनकारक असून, याचं उल्लंघन झाल्यास कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

****

होळीचा सण येत्या दोन मार्चला साजरा होत आहे. होळी पेटवताना, रंगांची उधळण करताना नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर महावितरण विभागानं केलं आहे. भूमिगत वीजवाहिन्यांपासून दुर अंतरावर होळी पेटवावी, होळीसाठी मोकळ्या जागेचा वापर करावा, होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचनाही महावितरणनं केल्या आहेत.

****

होळीनिमित्त रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि रत्नागिरी दरम्यान अतिरिक्त अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, 'दिवा-चिपळूण-दिवा' ही विशेष गाडी आता १ मार्चऐवजी २ मार्चपासून धावणार आहे. या गाडीसाठी प्रवाशांना सुपरफास्ट किंवा एक्स्प्रेसप्रमाणेच सामान्य शुल्क लागू असेल. या विशेष रेल्वे सेवेचे सविस्तर वेळापत्रक आणि अधिक माहिती 'रेल वन' या ॲपवर उपलब्ध करण्यात आली आहे.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.02.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 28 February 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ फेब्रुवारी २०२ सकाळी.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान दौऱ्यावर असून ते १६ हजार ६८० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकासप्रकल्पांचं उद्घघाटन आणि पायाभरणी करतील. नवीकरणीय ऊर्जा पारेषण प्रणालीचं उद्घघाटन आणि २१ हजार ८०० हून अधिक युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरणही ते करणार आहेत. पंतप्रधान राजस्थानमधूनच १४ वर्षांच्या मुलींसाठी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणाऱ्या देशव्यापी ‘एचपीव्ही’ लसीकरण कार्यक्रमाचाही प्रारंभ करतील.

****

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम सेथुरामन यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळ येत्या सहा ते दहा मार्च दरम्यान कोलंबियाच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार असून या शिष्टमंडळात संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर रामचंद्र पारकर, सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद,रामटेक इथले निवडणुक नोंदणी अधिकारी प्रीयेश महाजन, नाशिकचे बुथ लेव्हल अधिकारी सागर शिर्के यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळाला कोलंबियातील आठ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. भारताच्या निवडणूक आयोगाच्या उपक्रमांतर्गत भारतीय निवडणूक व्यवस्थेचा अनुभव जागतिक स्तरावर पोहोचवणं, तसंच कोलंबियातील निवडणूक प्रक्रियेचं निरीक्षण करून सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करणं हे या दौऱ्याचं उद्दिष्ट आहे. 

****

नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी.व्ही. रामन यांनी, ‘रामन इफेक्ट’ हा महत्त्वपूर्ण शोध लावला, या संशोधनाचं स्मरण म्हणून आजचा दिवस देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त पुण्यातील ‘आयुका’, ‘आयसर’, ‘जीएमआरटी’ आणि ‘पुणे वेधशाळा’ यांसारख्या नामवंत संस्थांमध्ये आज प्रदर्शनं, शास्त्रज्ञांशी संवाद आणि विविध वैज्ञानिक प्रयोगांचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘आयुका’तील अद्ययावत संशोधन सुविधा पाहण्याची संधी दिवसभर मिळणार आहे. राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र अर्थात ‘एनसीआरए’नं आज आणि उद्या नारायणगाव तालुक्यातल्या खोडद इथं विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. यावेळी विविध वैज्ञानिक प्रयोग, लघुपट दाखण्यात येणार असल्याचं ‘एनसीआरए’चे प्रशासकीय अधिकारी ए. बी. जोंधळे यांनी सांगितलं.

****

लातूर शहरात आज 'महा विधी सेवा शिबीर' आणि शासकीय योजनांचा महामेळावा  आयोजित करण्यात आला आहे. लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा महामेळावा शहरातील रुक्मिणी मंगल कार्यालय इथे सकाळी साडेदहा वाजता सुरु झाला.

****

होळीचा सण येत्या दोन मार्चला साजरा होत आहे. होळी पेटवताना तसंच रंगांची उधळण करताना नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर महावितरण विभागातर्फे करण्यात आलं आहे.

****

महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांना वेळेवर आणि तत्परतेने आरोग्य सुविधा द्याव्यात, तसंच कोणाच्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे काम करावं, अशा स्पष्ट सूचना परभणीचे महापौर सय्यद इकबाल यांनी दिल्या.

महापौर सय्यद इकबाल यांनी परभणी महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रांची पाहणी केल्यानंतर काल आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.शहरातील सर्व आरोग्य केंद्र पूर्णवेळ सुरू ठेवावीत, नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, प्रत्येक आरोग्य केंद्रावर पिण्याच्या पाण्याची तसंच स्वच्छतेची योग्य व्यवस्था उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.

***

गडचिरोली इथले भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष तथा नगर परिषदेचे आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे यांचं काल रात्री गडचिरोली इथं झालेल्या अपघातात निधन झालं. घरी जाताना वाटेत प्राणी आडवा आल्यामुळे काटवे खाली कोसळले. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, मात्र प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  मुक्तेश्वर काकडे  २०१६ मध्ये झालेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाले होते त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये पुन्हा ते निवडून आले. त्यानंतर ते नगर परिषदेचे आरोग्य सभापती झाले. 

****

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना होईल. श्रीलंकेतील पल्लेकेले इथं सायंकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. दरम्यान, सुपर आठ फेरीत उद्या कोलकाता इथं भारताचा सामना वेस्ट इंडिज सोबत होणार आहे.  या स्पर्धेतले उपांत्य फेरीतले सामने चार आणि पाच मार्च रोजी तर अंतिम सामना आठ मार्च रोजी होणार आहे.

****

 

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 28 فروری 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

 Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 28 February-2026
Time: 09:00-09:10 am
آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر
علاقائی خبریں
تاریخ: ۸۲/فروری ۶۲۰۲ء؁
وقت: ۰۱:۹-۰۰:۹
***** ***** *****
::::: سرخیاں::::::
پیش ہیں خاص خبروں کی سرخیاں:
٭ خانگی اسکولوں اور ٹیوشن کلاسیز میں فیس کی حد بندی کیلئے جلد ہی پالیسی کو حتمی شکل دی جائے گی۔
٭ مراٹھی بھاشا گورو دِن کل ہر طرف مختلف پروگراموں کے ساتھ جوش و خروش سے منایا گیا۔
٭ سجاوٹ کیلئے مصنوعی پھولوں کے استعمال پر حکومت نے دیا سخت کارروائی کا انتباہ۔
اور۔۔۔٭ چھترپتی سمبھاجی نگر میونسپل کارپوریشن کے اسپورٹس فیسٹیول کا آغاز۔
***** ***** *****
اب خبریں تفصیل سے...
حکومت جلد ہی ریاست میں خانگی اسکولوں اور ٹیوشن کلاسیز میں فیس کو محدود کرنے کی پالیسی کا اعلان کرے گی۔ اسکولی تعلیم کے وزیر دادا بھوسے نے کل اسمبلی میں یہ اعلان کیا۔ وہ ریاست میں اسکولوں کی حالت، آر ٹی ای اور متعلقہ مسائل پر اراکین کی جانب سے پوچھے گئے سوالات کے جواب دے رہے تھے۔ آر ٹی ای کے تحت داخلے کیلئے ایک کلومیٹر کی حد ہے، لیکن بھوسے نے یقین دلایا کہ جہاں اسکول نہیں ہے وہاں اس حد کو نرم کرنے پر غور کیا جائیگا۔ دادا بھوسے نے مزید کہا کہ ریاست کے تمام میڈیم اور انتظامیہ کے اسکولوں میں مراٹھی لازمی ہے اور حکومت اس کے موثر نفاذ کیلئے عہد کی پابندہے۔
***** ***** *****
مشہور مصنف وی وا شِرواڑکر عرف شاعر کُسماگراج، کا یوم پیدائش کل مراٹھی بھاشا گورو دِن کے طور پر ہر جگہ منایا گیا۔ ممبئی کے ودھان بھون میں ”جاوے وِنوداچیا گاوا“ کے عنوان سے ایک خصوصی پروگرام منعقد ہوا۔ پروگرام سے خطاب کرتے ہوئے وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس نے بتایا کہ چھترپتی شیواجی مہاراج نے مراٹھی زبان کی تطہیر کی بنیاد رکھی۔ وزیرِ اعلیٰ نے کہا کہ شیواجی مہاراج نے اس وقت مراٹھی پر فارسی اور عربی زبانوں کا اثر ختم کیا۔ انہوں نے مزید کہاکہ اس دور میں انتظامات چلانے کیلئے جو مراٹھی زبان تھی اس پر فارسی اور عربی سمیت دیگر زبانوں کے اثرات مرتب ہورہے تھے‘ تاہم شیواجی مہاراج نے مراٹھی زبان کو دیگر اثرات سے پاک کیا اور مراٹھی زبان کو قابلِ فخر بنایا۔
اس پروگرام سے خطاب کرتے ہوئے نائب وزیرِ اعلیٰ ایکناتھ شندے نے کہا کہ مراٹھی کو روزگار اور عالمی شناخت والی زبان بنایا جائے گا۔ شندے نے مزید کہا کہ حکومت مراٹھی کو نہ صرف ثقافت کی زبان بلکہ معیشت اور روزگار کی زبان بنانے کیلئے پُرعزم ہے۔
***** ***** *****
چوتھے عالمی مراٹھی سمیلن کا افتتاح کل ناسک کے کُسماگرج نگرمیں ہوا۔ وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس اور نائب وزیر اعلیٰ سُنیترا پوار کے ہاتھوں اس موقعے پر ریاستی حکومت کے مختلف ایوارڈ پیش کیے گئے۔ ڈاکٹر بھالچندر نیماڑے کو ساہتیہ بھوشن، شری نواس ونایک کلکرنی کو وِندا کرندیکر لائف ٹائم اچیومنٹ ایوارڈ سے نوازا گیا، جبکہ شانتی برہما، ماروتی بابا کوریکر کو عالمی مراٹھی سمیلن کا خصوصی ایوارڈ تفویض کیا گیا۔ اس موقعے پر سنت نیورُتّی ناتھ مہاراج کے ادب کیلئے ناسک کے سنت نیورُتی ناتھ مہاراج سنجیون سمادھی ٹرسٹ کو 50 لاکھ روپے کا چیک دیا گیا۔
***** ***** *****
چھترپتی سمبھاجی نگر ضلع کلکٹردفتر میں بھی فخرِمراٹھی زبان دن منایا گیا۔ ضلع کلکٹر دلیپ سوامی نے اس موقعے پر خطاب کرتے ہوئے کہا کہ مراٹھی زبان کے تحفظ اور بقاء اور عظمت کو برقرار رکھنا ہر مراٹھی بولنے والے کا فرض ہے۔ ڈاکٹر بابا صاحب امبیڈکر مراٹھواڑہ یونیورسٹی میں گزشتہ تین دنوں سے مراٹھی بھاشا گورو دن کی مناسبت سے مختلف سرگرمیوں کا اہتمام کیا گیا۔ جس کا اختتام کل نغمہ نویسی کی ورکشاپ اور لیکچر کے ساتھ ہوا۔
***** ***** *****
دھاراشیو کی ضلع لائبریری میں شاعرکُسماگرج کی شبیہہ پر پھول چڑھا کر اور شمع روشن کرکے مختلف موضوعات پر کتابوں کی نمائش کا افتتاح عمل میں آیا۔ اس موقعے پر اقامتی ڈپٹی کلکٹر وِدّیا چرن کڑَوکر اور دیگر افسران موجود تھے۔ اس موقعے پر خطاب کرتے ہوئے کَڑَوکر نے روزانہ کی بول چال میں مراٹھی زبان میں ہی بات کرنے کی اپیل کی۔
***** ***** *****
ناندیڑ میونسپل کارپوریشن میں میئر کویتا سنتوش مڑے کی سربراہی میں مراٹھی زبان سے متعلق عہد کا اجتماعی مطالعہ کیا گیا۔ اس موقعے پر میونسپل کمشنر ڈاکٹر مہیش کمار ڈوئی پھوڑے اور میونسپل کارپوریشن کے افسران و ملازمین بڑی تعداد میں موجود تھے۔
سوامی رامانند تیرتھ مراٹھواڑہ یونیورسٹی کے لسانیات‘ ادبیات اور مطالعاتی شعبے میں مراٹھی زبان گورو دن منایا گیا۔
***** ***** *****
سکھ مذہب کے گرو شری تیغ بہادر کی 350ویں برسی کے موقعے پر نئی ممبئی کے کھارگھر میں ایک خصوصی پروگرام کا اہتمام کیا گیا۔ انتظامیہ نے اس دو روزہ پروگرام کیلئے بڑے پیمانے پر انتظامات کیے ہیں۔
***** ***** *****
یہ خبریں آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر سے نشر کی جارہی ہیں۔
***** ***** *****
ممبئی عدالت ِ عالیہ کی اورنگ آباد بنچ نے چھترپتی سمبھاجی نگر ضلعے کی گرام پنچایتوں میں سرپنچوں کو بطورِایڈمنسٹریٹر تعینات نہ کرنے کے احکامات دئیے ہیں۔ عدالت نے کل یہ ہدایات ریاست میں میعاد ختم کرنے والی گرام پنچایتوں میں ایڈمنسٹریٹرس کی تقرری کے اعلامیے کو چیلنج کرنے والی ایک عرضی کی سماعت کے دوران دیں۔ عدالت نے مزید کہا ہے کہ سرپنچ ان جگہوں پر عہدے کو تسلیم نہ کریں جہاں ایڈمنسٹریٹر کی تقرری کے احکامات جاری کیے گئے ہیں۔ عدالت نے کل‘اہلیانگر ضلعے میں ایڈمنسٹریٹر کے طور پر مقرر گرام پنچایتوں کے سرپنچوں کو کوئی بھی مالیاتی فیصلہ نہ لینے کا بھی حکم دیا۔
***** ***** *****
وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس نے کہا ہے کہ ریاست میں غیر فطری مصنوعی پھولوں پر پابندی عائد ہے‘لہٰذا سجاوٹ کیلئے ان پھولوں کا استعمال کرنے والوں کے خلاف کارروائی کی جائے گی۔ وہ کل اسمبلی میں توجہ دلاؤ تحریک پر بحث کا جواب دے رہے تھے۔ رکنِ اسمبلی وکرم پاچپوتے نے کہا کہ وزیرِ اعلیٰ نے یقین دلایا ہے کہ اس کیلئے جلد ہی سرکاری حکم جاری کیا جائے گا۔
اس دوران وزیرِ ماحولیات پنکجا منڈے نے ایوان کو بتایا کہ ریاست میں اس سلسلے میں 92 ہزار سے زیادہ واقعات میں 25 کروڑ روپئے کا جرمانہ عائد کیا گیا ہے۔ کچھ اراکین نے ماحول دوست مصنوعات استعمال کرنے والے پروگراموں کو سرسبز و شاداب قرار دیکر مراعات دینے کی سفارش کی تھی۔ منڈے نے یقین دلایا کہ وہ ان سفارشات پر غور کریں گی۔
***** ***** *****
وزیر برائے امدادِ باہمی‘ باباصاحب پاٹل نے کہا ہے کہ پربھنی ضلع بینک میں بدعنوانی کی جلد از جلد جانچ کرکے قصورواروں کے خلاف کارروائی کی جائے گی۔ وہ کل‘ اسمبلی میں وقفہئ سوالات کے دوران بول رہے تھے۔ رکنِ اسمبلی ہریش پمپڑے نے پربھنی ضلع سنٹرل کوآپریٹیو بینک میں بدعنوانی کے بارے میں وقفہ سوالات کے دوران سوال اٹھایا تھا۔
***** ***** *****
طبی تعلیم کے وزیر حسن مشرف نے کل قانون ساز کونسل کو بتایا کہ چھترپتی سمبھاجی نگر کے گورنمنٹ میڈیکل کالج یعنی گھاٹی اسپتال کو ایمس کا درجہ دلانے کیلئے مرکزی حکومت سے نمائندگی کی جائے گی۔ وہ اس سلسلے میں رکن کونسل وکرم کالے کی طرف سے اٹھائے گئے توجہ دلاؤ تحریک کا جواب دے رہے تھے۔
مشرف نے بتایا کہ اہلیا نگر میں پنیہ شلوک اہلیا دیوی ہولکر سرکاری میڈیکل کالج کیلئے تین جگہوں کا انتخاب کیا گیا ہے اور اس بارے میں جلد ہی فیصلہ کیا جائے گا۔
***** ***** *****
باغبانی کے وزیر بھرت گوگاولے نے کل قانون ساز کونسل کو یقین دلایا کہ ہنگولی ضلعے میں بالا صاحب ٹھاکرے ہلدی تحقیقی مرکز پروجیکٹ کی جلد تکمیل کیلئے بجٹ میں ضروری گنجائش رکھی جائیگی۔ رکن کونسل ہیمنت پاٹل نے اس سلسلے میں جواب طلب کیا تھا۔
***** ***** *****
چھترپتی سمبھاجی نگر میونسپل کارپوریشن کے اسپورٹس فیسٹول کا‘ کل سے آغاز ہوا۔ فیسٹیول کا افتتاح بھارتی ہاکی ٹیم کے سابق کپتان پدم شری دھنراج پلّے نے کیا۔ اس موقع پر میئر سمیر راجورکر اور میونسپل کمشنر جی شری کانت موجود تھے۔ پلّے نے اپنی تقریر میں یقین دلایا کہ میونسپل اسکولوں کے طلبہ کو ہاکی سکھانے کیلئے ضرور وقت دیں گے۔ اس اسپورٹس فیسٹیول میں کرکٹ، کھو کھو، کبڈی، ڈاج بال، 100 میٹر کی دوڑ، رسی کھینچ‘ رسی پر اُچھل کود اور گولہ پھینک جیسے آٹھ کھیل شامل ہیں۔
***** ***** *****
لاتور ضلعے کی تمام پنچایت سمیتیوں کے چیئرمین اور ڈپٹی چیئرمین کے عہدوں کیلئے انتخابی عمل 9 مارچ کو ہوگا، اس کے بعد ضلع پریشد کے چیئرمین اور وائس چیئرمین کے عہدوں کیلئے انتخابات 16 مارچ کو ہوں گے۔
***** ***** *****
بیڑ میں وکلاء کی تنظیموں نے کل ضلع کلکٹر دفتر پر ایک مورچہ نکال کر بیڑ میں ممبئی ہائی کورٹ کی سرکٹ بنچ کے قیام کا مطالبہ کیا۔ بیڑ شہر میں مختلف اداروں کے قیام سمیت 11 مطالبات کیلئے یہ مورچہ نکالا گیا۔ وکلاء کی تنظیموں کی جانب سے ان تمام مطالبات پر مبنی ایک محضر ضلع انتظامیہ کو پیش کیا گیا۔
***** ***** *****
دھاراشیو نگر پریشد کے عام اجلاس میں آئندہ مالی سال کیلئے 314 کروڑ 21 لاکھ روپئے کے بجٹ کو منظوری دی گئی۔ اس بجٹ میں ٹیکسیز میں کسی بھی طرح کے اضافہ کی تجویز نہیں ہے۔
لاتور شہر میں آج ایک ”قانونی خدمات کیمپ اور سرکاری اسکیمات سے استفادے کا میلہ منعقد کیا گیا ہے۔ لاتور ڈسٹرکٹ لیگل سروسیز اتھارٹی اور ضلع انتظامیہ کے اشتراک سے منعقدہ یہ عظیم الشان میلہ صبح ساڑھے دس بجے شہر کے رکمنی ہال میں شروع ہوگا۔
***** ***** *****
::::: سرخیاں::::::
اور آخر میں اس بلیٹن کی خاص خبریں ایک بار پھر...
٭ خانگی اسکولوں اور ٹیوشن کلاسیز میں فیس کی حد بندی کیلئے جلد ہی پالیسی کو حتمی شکل دی جائے گی۔
٭ مراٹھی بھاشا گورو دِن کل ہر طرف مختلف پروگراموں کے ساتھ جوش و خروش سے منایا گیا۔
٭ سجاوٹ کیلئے مصنوعی پھولوں کے استعمال پر حکومت نے دیا سخت کارروائی کا انتباہ۔
اور۔۔۔٭ چھترپتی سمبھاجی نگر میونسپل کارپوریشن کے اسپورٹس فیسٹیول کا آغاز۔
***** ***** *****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...