Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 19 September
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १९ सप्टेंबर
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
विविध देशांच्या न्यायव्यवस्था, नियामक संस्था
आणि सरकारांनी एकत्र येऊन पर्यावरणीय न्याय अधिक मजबूत करण्याची सध्याच्या काळात आवश्यकता
आहे. केवळ पर्यावरणविषयक कायदे किंवा धोरणे बनवून भागणार नाही, तर त्यांची
प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि त्यातील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण
द्वारे आयोजित 'पर्यावरण आणि हवामान गतिमानतेचे भविष्य' या विषयावरील
दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान
भवन येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. १७ देशांतील न्यायिक प्रतिनिधी, सर्वोच्च
व उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती आणि पर्यावरण तज्ज्ञांची या परिषदा उपस्थिती आहे.
****
देशातल्या विविध ४५ ठिकाणी
२० वा रोजगार मेळावा आज आयोजित करण्यात येत आहे. या मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि
संस्थामध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या ५१ हजारांहून अधिक तरुणांना दूरदृष्य प्रणालीच्या
माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात येणार
आहे. या मेळाव्यामुळे विविध विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्ती पत्रे मिळणाऱ्या
तरुणांची एकूण संख्या १२ लाख ७५ हजारांवर पोहोचणार आहे. हा कार्यक्रम आज दुपारी साडेबारा
वाजता होणार आहे.
****
आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर
केंद्राचा आज सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने आकाशवाणीच्या
कार्यक्रमांमध्ये आगामी काळात विविध बदल आणि नव्या उपक्रमांची भर पडणार आहे. छत्रपती
संभाजीनगर इथं नुकत्याच झालेल्या आकाशवाणी श्रोता संघाच्या राज्यस्तरीय संमेलनात, कार्यक्रम
प्रमुख सुजित बनसोडे यांनी, श्रोत्यांनी मागणी केलेले सर्व कार्यक्रम पुढच्या वर्षभरात
सुरू करण्यात येतील, अशी माहिती दिली. नव्याने निर्मिती करण्यात येणारे कार्यक्रम
युवा केंद्रित असतील, असंही त्यांनी सांगितलं.
****
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन
ऑफ इंडिया'एलआयसी मधील कथित गुंतवणुकीच्या फसवणुकीप्रकरणी केंद्रीय
अन्वेषण विभाग सीबीआयने रिलायन्स कॅपिटल लिमिटेड, तिचे माजी
अध्यक्ष आणि अज्ञात सरकारी अधिकारी यांच्यासह काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एल आय सीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला. २०१२ ते २०१८
या कालावधीत एलआयसीने रिलायन्स कॅपिटलद्वारे जारी केलेल्या ३ हजार ९०० कोटी रुपये मूल्याच्या
पाच 'नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स'मध्ये गुंतवणूक केली होती. ही रक्कम सामान्य कॉर्पोरेट
कामकाज, निधीची गरज आणि विद्यमान कर्जाची पुनर्वित्त व्यवस्था
यासाठी वापरली जाणार होती.
आरोपींनी
गुन्हेगारी कट रचून फसवणूक, विश्वासाचा
गुन्हेगारी स्वरूपाचा भंग तसंच निधी अन्यत्र वळवणं आणि अपहार करणं यांसारखे गुन्हे
केल्याचा आरोप एलआयसीने केला आहे. या कथित कृत्यांमुळे एलआयसीचं सुमारे २ हजार ६८५
कोटी रुपयांचं नुकसान झालं असल्याचं एलाअयसीने तक्रारीत म्हटलं आहे.
****
घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू
असलेली साखरेची १५ दिवसांची साठवणूक मर्यादा ३० दिवसांपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्रसरकारने
घेतला आहे. मात्र, १५ दिवसांच्या सध्याच्या मर्यादेपेक्षा अधिक ठेवला जाणारा
साखरेचा साठा केवळ अॅडव्हान्स ऑथरायझेशन स्कीम म्हणजेच अग्रिम अधिकार योजना आणि टॅरिफ
रेट कोटा म्हणजेच, शुल्क दर कोटा अंतर्गत आयात केलेल्या साखरेतूनच प्राप्त
केलेला असावा, अशी अट घालण्यात आली आहे.
खुल्या बाजारातून खरेदी करण्यात
येणाऱ्या साखरेच्या साठवणुकीची मर्यादा मात्र पूर्वीप्रमाणेच राहणार असून, ती केवळ
१५ दिवसांच्या वापरापुरती मर्यादित असेल. तसंच, साखरेच्या
साठ्याची घोषणा आणि दर शुक्रवारी साखरेच्या साठ्याची साप्ताहिक माहिती जाहीर करण्याची
यंत्रणाही सरकारने लागू केली आहे.
****
सरकारने मोठ्या घाऊक ग्राहकांसोबत
सविस्तर चर्चा केली असून, साखरेची बाजारपेठ स्थिर आणि नियमित ठेवण्यासाठी, त्यांच्या
सूचनांचा विचार करण्यात आला आहे.
राज्यातल्या अडचणीत आलेल्या
४६९ पतसंस्थांच्या मालमत्ता जप्त करुन विक्रीसाठी राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्यात
समितीची स्थापना केली आहे. ही समिती थकबाकीदार, जामीनदार, दोषी संचालक, आदींच्या
मालमत्ता जप्त करुन, त्यांचा विशेष वसुली अधिकाऱ्यांना ताबा देण्यासाठी मदत
करेल, तसंच मालमत्तांच्या लिलावातल्या अडचणी सोडवेल, असं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात ग्राहकांना
अधिकाधिक चांगली वीजसेवा देण्याबरोबरच शून्य थकबाकीलाही प्राधान्य देण्याचे निर्देश
महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी दिले. काल परभणी इथं महावितरणचे व्हिजन आणि मिशन
या विषयावर थेट संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. बदलत्या काळानुसार महावितरणच्या अधिकारी
कर्मचाऱ्यांमध्येही सकारात्मक बदलाची अपेक्षा औंढेकर यांनी व्यक्त केली.
****
धाराशिव जिल्ह्याच्या वैभवशाली
वारशाचं जतन करतानाच पर्यटक आणि भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी
जिल्ह्यातील संरक्षित स्मारकं आणि पर्यटनस्थळांच्या विकासाला आता नियोजनबद्ध चालना
दिली जात आहे.
****
No comments:
Post a Comment